मोबाइलवर चित्रीकरण : आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:15 AM2017-11-27T07:15:28+5:302017-11-27T07:15:47+5:30

गुंगीचा पदार्थ मिसळलेले शितपेय पाजून बेशुद्धावस्थेत विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी अतुल कदम याचा अटकपूर्व जामीनअर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

 Moving on Mobile: Rejecting the anticipatory bail of the accused | मोबाइलवर चित्रीकरण : आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मोबाइलवर चित्रीकरण : आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Next

मुंबई : गुंगीचा पदार्थ मिसळलेले शितपेय पाजून बेशुद्धावस्थेत विवाहितेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी अतुल कदम याचा अटकपूर्व जामीनअर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कदमविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली.
आरोपी आणि फिर्यादी फिल्मसिटीमध्ये एकाच ठिकाणी कामाला असल्याने अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तो फिर्यादीला धमकावण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची तसेच साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे, असे म्हणत पोलिसांनी त्याला अटकपूर्व जामीनाला विरोध केला. मात्र तो फेटाळला गेल्यानंतरही आरोपी न्यायालयात हजर असताना त्याला अटक करण्यात आले नाही, असे फिर्यादीचे म्हणणे आहे. आरोपीने बलात्काराचे मोबाइलवर चित्रण केल्याने त्याला मोबाईल तसेच क्लिप हस्तगत करण्याबाबतचा मुद्दा पोलिसांनी टाळल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
तीन मुले असलेली पीडित महिला शैला (बदललेले नाव) ही गेल्या नऊ वर्षांपासून गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करते. पती व्यसनी असल्याने २०१६ पासून ती माहेरी राहाते. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर आपली आरोपीशी ओळख झाली. मेकअपमन असल्याने त्याने आपल्याला अनेक अभिनेत्रींचे हेअर स्टायलिस्ट म्हणून काम दिले. कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी २0१४ रोजी आरोपीने आपल्याला त्याच्या गोरेगाव (पुर्व) येथील नागरी निवारा परिषदेतील घरी बोलावले आणि शितपेयात गुंगीचा पदार्थ मिसळून बेशुद्धावस्थेत असताना आपल्यावर बलात्कार केला, अशी फिर्यादी महिलेली तक्रार आहे.
शरीरसंबंध ठेवण्यास विरोध केला असता आरोपीने आपली अश्लील छायाचित्रे आपल्या निवासस्थानी येऊन सासू - सासरे तसेच शेजाºयांना दाखवून बदनामी केल्याबाबत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मालाड पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले आहेत. राष्ट्रीय अपराध आणि भ्रष्टाचार निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना या तक्रारीची दखल घेण्याचे पत्र पाठवले. त्यानंतरच पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title:  Moving on Mobile: Rejecting the anticipatory bail of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.