निम्म्याहून अधिक जलमापक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:54 AM2019-02-24T00:54:34+5:302019-02-24T00:54:50+5:30

मुंबईतील २४ तास पाणीपुरवठ्याला फटका : प्रकल्पाचे उद्दिष्ट धोक्यात

More than half the water meter closed | निम्म्याहून अधिक जलमापक बंद

निम्म्याहून अधिक जलमापक बंद

Next

मुंबई : अपुरा जलसाठ्याबरोबरचं बंद पडलेल्या जलमापकांचाही मोठा फटका महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाला बसला आहे. मुंबईतील निम्म्यांहून अधिक जलमापकं बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उद्दिष्टच धोक्यात आले आहे.


मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने वांद्रे आणि मुलुंड परिसरात प्रयोग सुरू केला. यासाठी शंभर टक्के जलमापक असणे आवश्यक आहे. स्वयंचलित जलमापक बसविण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आला.


या प्रकल्पातून अपेक्षित निकाल मिळाला नाही. २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाचा भाग म्हणून आढावा घेताना जेमतम २५ टक्के जलमापक सुरू असल्याचे आढळून आल्याचे जल अभियंता खात्यातील सुत्रांनी सांगितले. प्रमुख जल अभियंता ए. तवाडिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


जकात कर बंद झाल्यामुळे मालमत्ता कर व विकास कर पाठोपाठ पाणीपट्टी व मलनिस्सारण कराकडे देखील उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत म्हणून पाहिले जात आहे. पाणीपट्टीतून महसूल मिळण्यासाठी शंभर टक्के जलमापक बसविणे आवश्यक आहे. पाणीपट्टी आणि मलनिस्सारण करातून १६०० कोटी रुपये महसूल महापालिकेला अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ ७० टक्के पाणीपुरवठ्यावरचे शुल्क आकारणे शक्य होत आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपये विविध सरकारी व खाजगी कार्यालयांकडे प्रलंबित आहेत.

नऊशे दशलक्ष लिटर पाणी जाते वाया
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी ३० टक्के म्हणजेच नऊशे दशलक्ष लिटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते. शंभर टक्के स्वयंचलित जलमापक बसविण्याचा प्रकल्प २००९ मध्ये पालिकेने हाती घेतला होता. झोपडपट्ट्यांमध्ये जलमापकांबरोबर छेडछाड करण्यात येत असल्याने झोपड्यांना या प्रकल्पातून वगळण्यात आले.
मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी ३० टक्के म्हणजेच नऊशे दशलक्ष लिटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते.
च्शंभर टक्के स्वयंचलित जलमापक बसविण्याचा प्रकल्प २००९ मध्ये पालिकेने हाती घेतला होता. झोपडपट्ट्यांमध्ये जलमापकांबरोबर छेडछाड करण्यात येत असल्याने झोपड्यांना या प्रकल्पातून वगळण्यात आले.
मुंबईत चार लाख जलमापक आहेत. यांपैकी दोन लाख जलमापक झोपडपट्टी विभागात आहेत. शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरात सरासरी २३ ते ३० टक्के जलमापक सुरू आहेत.
च्मुंबईत बसविण्यात आलेल्या जलमापकांपैकी ८५ टक्के घरगुती जोडण्या, १४ टक्के व्यावसायिक तर एक टक्के औद्योगिक जलजोडण्या आहेत.
च्मुंबईत २४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी शंभर टक्के जलमापक बसविणे आवश्यक आहे. वांद्रे येथील एच पश्चिम आणि मुलुंड म्हणजे टी विभागात हा प्रयोग सुरू आहे.

Web Title: More than half the water meter closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.