वर्सोवा बीचवर भरली कासवांची जत्रा, 20 वर्षांनंतर आढळले ओलिव्ह रिडेल प्रजातीची कासवं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 05:24 PM2018-03-22T17:24:21+5:302018-03-22T17:24:21+5:30

मुंबईतील वर्सोवा बीचवर गुरूवारी सकाळी सगळ्यांनाच सुखद अनुभव देणारी घटना घडली.

more than 50 turtle found at versova beach | वर्सोवा बीचवर भरली कासवांची जत्रा, 20 वर्षांनंतर आढळले ओलिव्ह रिडेल प्रजातीची कासवं

वर्सोवा बीचवर भरली कासवांची जत्रा, 20 वर्षांनंतर आढळले ओलिव्ह रिडेल प्रजातीची कासवं

Next

मुंबई- मुंबईतील वर्सोवा बीचवर गुरूवारी सकाळी सगळ्यांनाच सुखद अनुभव देणारी घटना घडली. आज सकाळी मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना कासवाची पिल्लं दिसली. सातबंगला येथील सागर कुटीरजवळ त्यांना कासवाची 80 पिल्लं आढळली.वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्लं ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत. या पिल्लांच्या कवचाचा रंग फिकट गुलाबी हिरवा असतो.या जातीच्या कासवाच्या मादीने 80 कासवांच्या पिल्लाला जन्म दिला.आणि येथील वाळूत ही छोटीशी कासवे बागडत होती.

नोव्हेंबर ते मार्च हा कासवांच्या प्रजननाचा काळ असतो. कासवाची मादी किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये अंडी घालून समुद्रात परतते. त्यांनतर 45 ते 50 दिवसांनी त्यामधून पिल्ले बाहेर येतात.दरम्यान, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील या कासवाच्या पिल्लांना पर्यावरण अधिकारी आणि वनविभागाने समुद्रात सोडलं. 

15 ऑक्टोबर 2015 रोजी वर्सोवा, गंगा भवन समोर राहणाऱ्या अँड.अफरोझ शाह यांनी बकाल वर्सोवा बीच स्वच्छ करण्याचे स्वप्न बघितलं होतं.आणि गेली 127 आठवडे दर शनिवारी आणि रविवारी त्याची व्हीआर्व्ही (वर्सोवा रेडिडंट्स व्हॉलेंटीयर्स)चे कार्यकर्ते वर्सोवा बीच स्वच्छता मोहिम राबवत आहे.आज खऱ्या अर्थाने त्यांच्या वर्सोवा बीच स्वच्छता मोहिमेला घवघवीत यश मिळालं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आमच्या स्वच्छता मोहिमेचे हे खरे यश असून यामुळे आपल्याला खूप आनंद झाला असून जर समुद्र स्वच्छ ठेवला तर गेली 20 वर्षे येथून गायब झालेले दुर्मिळ  रिडली समुद्र कासव आणि इतर जलचर प्राणी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील असा विश्वास अफरोझ शाह यांनी व्यक्त केला.
 

Web Title: more than 50 turtle found at versova beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.