'Mojo', 'One-Above' approval of the office, building proposal department information | ‘मोेजो’, ‘वन अबव्ह’ला आॅफिसची मान्यता, इमारत प्रस्ताव विभागाची माहिती

मुंबई - कमला मिल कम्पाउंडमधील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ रेस्टॉरंटला लागलेल्या आग प्रकरणात ५ अधिकाºयांच्या निलंबनानंतर, महापालिकेच्या विभागांतर्गतच धुसफूस सुरू असून, आपल्या बचावासाठी एका विभागातील अधिकारी दुस-याला दोष देऊ लागले आहेत. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने येथे कार्यालयासाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले आहे. तर जी दक्षिण विभागातील आरोग्य विभागाने उपहारगृहाचा परवाना दिला असल्याचे सूत्रांकडून समजते.
या आगीच्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, पालिका आयुक्त अजय मेहता यांनी जी दक्षिण विभागातील इमारत प्रस्ताव, अग्निशमन आणि आरोग्य विभागातील अधिकाºयांचे निलंबन केले. मात्र, या विभागांच्या सहायक आयुक्तांची केवळ बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तांवरही आरोप सुरू असून, या चौकशीचे सूत्र त्यांच्याकडून काढून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याच वेळी आयुक्तांनी प्रथमदर्शनी या घटनेची त्यांच्याकडे असलेली माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
इमारत प्रस्ताव विभागाने कमला मिलमध्ये सदर ठिकाणी कार्यालयाची परवानगी दिली, असल्याचे स्पष्ट करीत आपला बचाव केला आहे. जी दक्षिणमधील आरोग्य विभागाने या रेस्टॉरंटना उपहारगृहाचा परवाना दिला, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात निलंबित झालेले जी दक्षिण विभागाचे वैद्यकीय
आरोग्य अधिकाºयांची अडचण वाढू शकते. त्याचबरोबर, विभाग अधिकारी असूनही या घडामोडींबाबत माहिती नसल्याने जी दक्षिण विभाग अधिकारी सपकाळे यांच्या दिशेनेही संशयाची सुई फिरत आहे.

बचाव करण्याचा प्रयत्न सुरू

इमारत प्रस्ताव विभागाने कमला मिलमध्ये सदर ठिकाणी कार्यालयाची परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. जी दक्षिणमधील आरोग्य विभागाने या रेस्टॉरंटना उपहारगृहाचा परवाना दिला, असे सांगत बचाव करण्यात येत आहे.