mobile thief Girl's arrested | बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल 
बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल 

मुंबई - गर्लफ्रेंडवर पैसे खर्च करण्यासाठी तरुणांनी चोरी अफरातफर केल्याचे तुम्ही अनेकवेळ ऐकले असेल, पण बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी दोन तरुणींनी चक्क मोबाईल चोरत असल्याचे उघडकीस आले आहे. लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यातून मोबाईल चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी या दोन तरुणींना अटक केली असून, त्यांच्याकडून 38 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही तरुणी एकाच तरुणाला डेट करत होत्या. 
या संदर्भात रेल्वे क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, ट्विंकल सोनी (20) आणि टीनल परमार (19) या तरुणी रिषी सिंह नामक तरुणाला डेट करत होत्या. बॉयफ्रेंडसोबत मौज मस्ती करण्यासाठी त्या मोबाइल चोरून राहुल राजपुरोहित नामक व्यक्तीला विकत असत. या व्यक्तीने हे मोबाइल 3 लाखांहून अधिक किमतीला विकत घेतले. दरम्यान, या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. 
 बोरिवली ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान चोरीच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या  चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार महिला पोलिसाना कांदिवली रेल्वे स्टेशनबाहेर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी ट्विंकल सोनी नामक तरुणीला रंगेहात पकडले. त्यानंतर टीनल परमार  आणि राहुल राजपुरोहित यांना अटक केली. सोनी ही आर्किटेक्चरची विद्यार्थिनी आहे, तर टीनल पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे.  


Web Title: mobile thief Girl's arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.