बनावट फेसबुक अकाउंटवर शेअर केला महिलेचा मोबाइल क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:08 AM2018-04-16T07:08:21+5:302018-04-16T07:08:21+5:30

एका महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर त्या महिलेच्या बहिणीचा मोबाइल क्रमांक शेअर केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. त्या फेसबुक पोस्टवर मोबाइल नंबरसह ‘कॉल मी’ असा मेसेजही टाकण्यात आला होता.

 The mobile number of the woman shared with the fake Facebook account | बनावट फेसबुक अकाउंटवर शेअर केला महिलेचा मोबाइल क्रमांक

बनावट फेसबुक अकाउंटवर शेअर केला महिलेचा मोबाइल क्रमांक

Next

मुंबई - एका महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यावर त्या महिलेच्या बहिणीचा मोबाइल क्रमांक शेअर केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. त्या फेसबुक पोस्टवर मोबाइल नंबरसह ‘कॉल मी’ असा मेसेजही टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांना एकामागोमाग एक अनोळखी क्रमांकावरून फोन सुरू झाले. फोन करणाऱ्या व्यक्तींनी हा मोबाइल क्रमांक फेसबुक अकाउंटवरून मिळाल्याचे सांगितले. त्या महिलेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार ४० वर्षीय महिला मुलुंड परिसरात आई-वडील आणि बहिणीसोबत राहते. त्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या बहिणीच्या नावाने २२ मार्च रोजी कोणी तरी बनावट फेसबुक अकाउंट उघडल्याचे त्यांना समजले. त्यांनी बहिणीकडे याबाबत विचारपूस केली. तिने असे कुठलेच अकाउंट उघडले नसल्याची माहिती दिली. त्या अकाउंटवर ७ एप्रिल रोजी तक्रारदार महिलेचा मोबाइल क्रमांक शेअर करण्यात आला. त्याखाली ‘कॉल मी’चा मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे त्यांना एकामागोमाग एक अनोळखी क्रमांकावरून फोन सुरू झाले.
गुरुवारी त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title:  The mobile number of the woman shared with the fake Facebook account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.