‘सेनेत प्रवेशासाठी लांडेंकडून मोठी आॅफर’ मनसे नगरसेवकाचा आरोप, एसीबीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:30 AM2017-10-20T04:30:04+5:302017-10-20T04:30:17+5:30

शिवसेनेत प्रवेश करताना मनसेच्या सहा नगरसेवकांनी मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. प्रवेशासाठी आपल्यालाही गटनेते दिलीप लांडे यांनी पैशांची आॅफर दिली होती, अशी तक्रार...

 MNS corporator charged with 'access to army', complaint against ACB | ‘सेनेत प्रवेशासाठी लांडेंकडून मोठी आॅफर’ मनसे नगरसेवकाचा आरोप, एसीबीकडे तक्रार

‘सेनेत प्रवेशासाठी लांडेंकडून मोठी आॅफर’ मनसे नगरसेवकाचा आरोप, एसीबीकडे तक्रार

Next

मुंबई : शिवसेनेत प्रवेश करताना मनसेच्या सहा नगरसेवकांनी मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. प्रवेशासाठी आपल्यालाही गटनेते दिलीप लांडे यांनी पैशांची आॅफर दिली होती, अशी तक्रार मुंबई महापालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)कडे केली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, असे लेखी निवेदन त्यांनी गुरुवारी एसीबीकडे सादर केले आहे.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात वरचष्मा ठेवण्यासाठी शिवसेनेने गेल्या आठवड्यात मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडून खळबळ उडविली होती. या नगरसेवकांनी प्रत्येकी ५ कोटी घेतल्याच्या आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आता मनसेचे एकमेव नगरसेवक तुर्डे यांनी त्याबाबत एसीबीकडे तक्रार केली आहे.
१२ आॅक्टोबरला वॉर्ड विभाग कार्यालयात रस्ते विभागाची संयुक्त बैठक झाल्यानंतर दिलीप लांडे यांनी दुपारी १च्या सुमारास प्रभाग समितीच्या कार्यालयात बोलाविले. ‘आम्ही सहाही नगरसेवकांनी सेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. तू प्रवेश करणार आहेस का? आयुष्यात तुला कधी पैशांची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेऊ. तुझी जर तयारी असेल तर रक्कम निश्चित करू,’ असे आमिष दाखवल्याचा आरोप तुर्डे यांनी केला आहे.
‘मी तयार नसून आपणही राजसाहेबांना सोडू नये,’ अशी विनंती केल्याचे तुर्डे यांनी म्हटले आहे. मात्र लांडे यांनी या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी दिल्याचेही तुर्डे यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र तुर्डे यांनी खळबळजन आरोप करीत याप्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली असली तरी लांडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आरोप फेटाळला
नगरसेवक दिलीप लांडे यांनी संजय तुर्डे यांच्या आरोप फेटाळला. पक्षात होणारी घुसमट व मराठी महापौर कायम राहावा, यासाठी सहा नगरसेवकांनी मनसे सोडल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title:  MNS corporator charged with 'access to army', complaint against ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.