मनसे नाणारवासीयांसाठी रस्त्यावर उतरेल, राज ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 09:18 PM2018-04-14T21:18:15+5:302018-04-14T21:18:15+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

MNS Chief Raj Thackeray oppose to Ratnagiri's nanar refinery project | मनसे नाणारवासीयांसाठी रस्त्यावर उतरेल, राज ठाकरेंचा इशारा

मनसे नाणारवासीयांसाठी रस्त्यावर उतरेल, राज ठाकरेंचा इशारा

Next

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासीयांनी शनिवारी (14 एप्रिल) राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. 'सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल', असे आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी नाणारवासीयांना दिलं आहे.

नाणार प्रकल्पासाठी निम्मा पैसा सौदीचा

भारत सरकारच्या तीन तेल कंपन्या मिळून कोकणात उभारणार असलेल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण व पेट्रो प्रकल्पासाठी जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी सौदी अरबस्तानची सोदी आरामको ही कंपनी ५० टक्के भांडवली गुंतवणूक करणार आहे, तसेच या कारखान्यासाठी लागणाऱ्या ५० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठाही ही सौदी कंपनी करणार आहे.

‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स’ नावाचा हा तीन अब्ज रुपये खर्चाचा प्रकल्प इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या मिळून उभारत आहेत. सौदी अरबस्तानचे ऊर्जा व नैसर्गिक संसाधनमंत्री खलिद अल फलिह यांनी सौदी आरामकोच्या वतीने या प्रकल्पातील सहभागासंबंधीचा सामंजस्य करार केला

असा असेल हा प्रकल्प
मुख्य तेल शुद्धीकरण कारखाना बाभुळवाडीत १४ हजार एकरावर.
तेथून १५ किमी अंतरावर एक हजार एकर जागेवर तेलाच्या टाक्या व बंदर सुविधा.
एकूण अपेक्षित खर्च तीन अब्ज रुपये.
वाषिक क्षमता- ६० दशलक्ष टन तेल शुद्धिकरण व १८ दशलक्ष टन पेट्रो उत्पादने.
अपेक्षित उभारणी सन २०२५ पर्यंत.

Web Title: MNS Chief Raj Thackeray oppose to Ratnagiri's nanar refinery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.