१ जूनला निघणार म्हाडाच्या तब्बल २७४ दुकानांची सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:18 AM2019-05-17T01:18:41+5:302019-05-17T01:18:51+5:30

दुकानांची ही सोडत आणि संपूर्ण प्रक्रिया प्रथमच म्हाडाच्या आयटी विभागामार्फत बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने पार पडणार आहे.

 Mhada's 274 shops will go out on 1st June | १ जूनला निघणार म्हाडाच्या तब्बल २७४ दुकानांची सोडत

१ जूनला निघणार म्हाडाच्या तब्बल २७४ दुकानांची सोडत

Next

मुंबई : म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळातील २७४ दुकानांची सोडत १ जून रोजी पार पडणार आहे. दुकानांची ही सोडत आणि संपूर्ण प्रक्रिया प्रथमच म्हाडाच्या आयटी विभागामार्फत बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने पार पडणार आहे. यासाठी २७ मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून २९ मे ते ३१ मे दुपारी २ वाजेपर्यंत आॅनलाइन बोली लावता येणार असल्याची माहिती म्हाडाच्या आयटी विभागामार्फत देण्यात आली.
म्हाडाच्या मुंबई मंंडळामार्फत यापुर्वी २०१० मध्ये १६८ दुकानांसाठी विक्रीची जाहिरात काढण्यात आली होती. यानंतर नव्याने दुकानांसाठी सोडत निघण्यासाठी ९ वषार्चा कालावधी लागला. या सोडतीत जादा बोलीनुसार दुकानांचा ताबा देण्यात येणार आहे. म्हाडाकडून उपलब्ध केल्या जाणार्या दुकानांसाठी स्वतंत्रपणे सोडत जाहीर होते. त्यातील जाहिरातीनुसार नोंदणी, आॅनलाइन अर्ज दाखल करणे, कागदपत्रे डाउनलोड करण्यासारख्या तांत्रिक गोष्टींसाठी २७ मे पर्यंतची अंतिम मुदतदेण्यात आहे.
म्हाडामार्फत दुकानांची काढण्यात आलेल्या दुकानांच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम अनमत रक्कम म्हणून अर्जदारास भरावी लागणार आहे. या सोडतीमध्ये मालाड-मालवणी येथे ६९, सायन-प्रतीक्षानगर येथे ३५ दुकाने, कोकण मंडळाची विरार-बोळींज, वेंगुर्ले येथे दुकाने आहेत. पार पडणार्या ई लिलावातील विजेत्यास पालिकेच्या आरक्षणाप्रमाणेच दुकानांच्या वापर करणे अपेक्षित आहे.
ई- लिलाव होताना शेवटच्या मिनिटांमध्ये बोली करून सोडत जिंकण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणूनही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणतीही बोली नोंदवल्यानंतर त्यापुढील दहा मिनिटांचा कालावधी इतर स्पर्धकांना मिळणार आहे. त्यामुळे बोलीत सहभागी होणार्या प्रत्येकास समान संधी उपलब्ध होईल, असा म्हाडाचा दावा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यावर भर असल्याचे म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई यांनी स्पष्ट केले आहे. म्हाडाने या सोडतीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरसाठी आयआयटीकडून प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यात कोणताही दोष राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरमध्ये परताव्यासह अन्य गोष्टी सहज शक्य होऊन वेळेत बचत होणार आहे.

Web Title:  Mhada's 274 shops will go out on 1st June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा