म्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 05:20 AM2018-09-13T05:20:51+5:302018-09-13T05:21:00+5:30

म्हाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उदय सामंत यांनी म्हाडातील वरिष्ठ अधिका-यांशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला.

MHADA will leave political leaders in foreign countries | म्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार

म्हाडाच्या परदेश दौऱ्यातून राजकीय नेत्यांना वगळणार

Next

- अजय परचुरे 
मुंबई : म्हाडाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उदय सामंत यांनी म्हाडातील वरिष्ठ अधिका-यांशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. या बैठकीत यापुढे म्हाडाच्या कोणत्याही परदेश अभ्यास दौºयावर राजकीय नेता जाणार नाही, तर फक्त म्हाडाचे इंजिनीअर, घरांच्या संदर्भातील तज्ज्ञच जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे या दौºयावरून आल्यावर तेथील माहितीचा फायदा हे इंजिनीअर आणि तज्ज्ञ जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
बैठकीत म्हाडाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर विविध कामांना होणाºया विलंबाबाबत सामंत यांनी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे म्हाडाच्या सर्व परदेश अभ्यास दौºयांतून राजकीय व्यक्तींना वगळण्यात येईल, असा निर्णय त्यांनी घेतला. अभ्यास दौरा अभ्यासासाठी असतो. तेथे फक्त अभ्यास व्हावा व त्या अभ्यासाचा उपयोग म्हाडाला व्हावा, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचप्रमाणे म्हाडा ज्या कंत्राटदारांना गृहसंकुले बांधण्यासाठी कंत्राट देते ते बहुतांशी खासगी बिल्डरच असतात. दिलेल्या वेळेत ते काम पूर्ण करीत नाहीत. याचा मोठा फटका म्हाडाला बसतो. कंत्राटदारांना वाढीव पैसा द्यावा लागतो. शिवाय सामान्य नागरिकांना घर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळेच सर्व कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा, किती वेळेत कामे पूर्ण केली, याचा अहवाल पुढच्या ८ दिवसांत देण्याचे आदेश सामंत यांनी बैठकीतील अधिकाºयांना दिले. अहवालानंतर जे कंत्राटदार दोषी आढळतील त्यांच्यावर तातडीने कारवाइचे संकेतही त्यांनी दिले.
>अतिक्रमणे हटविण्यासाठी नेमणार समिती
म्हाडाच्या अधिकाºयांसोबत उदय सामंत यापुढे दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेतील. म्हाडाचे प्रत्येक काम कुठपर्यंत आले, त्यात किती सुधारणा झाली याकडे लक्ष दिले जाईल. मुंबईतील म्हाडाच्या जागांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी तातडीची समिती नेमून सर्व अतिक्रमणे येत्या ६ महिन्यांत हटवून तिथे म्हाडाच्या घरांचे काम सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: MHADA will leave political leaders in foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा