म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थीेंचे त्याच जागी करणार पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:57 AM2019-02-05T06:57:20+5:302019-02-05T06:57:32+5:30

मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

MHADA transit camp will rehabilitate the same place | म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थीेंचे त्याच जागी करणार पुनर्वसन

म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थीेंचे त्याच जागी करणार पुनर्वसन

Next

मुंबई : मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे झालेल्या घुसखोरीस जबाबदार असलेल्या म्हाडातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
काही आर्थिक मोबदला देऊन मुखत्यारपत्र किंवा अशा प्रकारच्या इतर प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून अनियमितपणे किंवा बेकायदेशीररीत्या हक्क घेतलेले गाळेधारकही संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. अशा प्रकारचा व्यवहार बेकायदेशीर असला तरीही त्यांनी काही आर्थिक रक्कम दिली असल्याने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला आहे. सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबिरातील गाळ्याच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम ,त्यासोबत पुनर्वसित गाळ्यास पुरविण्यात येणाºया पायाभूत सोयी-सुविधांचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. त्यानंतर पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. यासाठी मुद्रांक शुल्क व इतर लागू असलेल्या सर्व प्रकारच्या शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकाने भरणे आवश्यक राहणार आहे.
गाळ्यांचे मूळ मालक आणि मुखत्यारपत्र धारकांव्यतिरिक्त या शिबिरांमध्ये अनधिकृतपणे ताबा घेतलेले घुसखोर देखील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मूळ अटी व शर्तींचे निकष लावून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. निकष पूर्ण करणाºया गाळेधारकांकडून सध्याच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खचार्ची रक्कम पुनर्वसित गाळ्यास पुरविण्यात येणाºया पायाभूत सोयी-सुविधांचा खर्च आणि या दोन्ही रकमेवर २५ टक्के दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. त्यासाठी मुद्रांक शुल्क व लागू असलेले इतर सर्व प्रकारचे शासकीय शुल्क संबंधित गाळेधारकाने भरणे आवश्यक राहणार आहे.
मुखत्यारपत्र आणि घुसखोर या दोन्ही प्रवर्गातील गाळेधारकांचे पुनर्वसन शक्य असल्यास पुनर्विकास होत असलेल्या संक्रमण शिबिरांच्या इमारतीमध्ये, आहे त्याच ठिकाणी करण्यात येईल. ते शक्य नसल्यास बृहन्मुंबई क्षेत्रातील इतरत्र उपलब्ध ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. तसेच तिन्ही प्रवर्गातील ताबाधारकांना, ते सध्या मुंबई दुरूस्ती मंडळ किंवा सक्षम प्राधिकरणास सध्या देत असलेले भाडे व देखभाल खर्चांमध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. प्रस्तावित फेरवाटप जागेचा ताबा घेण्यापूर्वी देय असलेले सर्व मासिक शुल्क त्यांनी देणे आवश्यक असेल. अशी सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच संबंधित गाळेधारक फेरवाटपासाठी पात्र ठरणार आहेत. या सर्व रहिवाशांचे पात्र-अपात्रतेचे निकष ठरविण्याची कार्यवाही म्हाडाच्या स्तरावर करण्यात येईल. मूळ गाळेधारकास करण्यात येणारे सदनिकांचे वाटप त्याच्या आधारक्रमांकाशी संलग्न केले जाईल.

असे होणार काम
मुंबईत म्हाडाची ५६ संक्रमण शिबिरे असून त्यात २१,१३५ गाळे आहेत.
जुलै २०१३ अखेरपर्यंत संक्रमण शिबिरातील ८ हजार ४४८ गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनधिकृत रहिवाशी वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. यापैकी काही रहिवाशी ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून तेथे राहत आहेत.
शिबिरांतील अधिकृत, अपात्र आणि अनधिकृत रहिवाशांचे निवाºयासंबंधीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे अथवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी शक्यतो त्यांचे कायम पुनर्वसन केले जाणार आहे.
त्यासाठी त्यांची तीन प्रकारांत वर्गवारी करून पुनर्विकसित होणाºया संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसनाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
प्रस्तावित पुनर्रचित इमारतीमध्ये आहे त्याच ठिकाणी गाळे वाटप स्वीकारणे किंवा तेथील मालकी हक्क सोडण्याच्या अधीन राहून त्याचे संक्रमण शिबिरांमध्ये कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पुनर्वसन नि:शुल्क केले जाईल.
मुंबई दुरुस्ती मंडळास गाळेधारक सध्या देत असलेले भाडे आणि देखभाल शुल्कामध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. तसेच, पुनर्वाटप होईपर्यंतच्या कालावधीतील सर्व प्रकारची देणी त्यांनी म्हाडा प्राधिकरणास देणे आवश्यक असेल.

Web Title: MHADA transit camp will rehabilitate the same place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.