mhada lottery soon know the all details about number of homes and their location in mumbai | लवकरच म्हाडाची लॉटरी; जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर?
लवकरच म्हाडाची लॉटरी; जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर?

मुंबई: येत्या एक दोन महिन्यांमध्ये म्हाडाकडूनमुंबईतीलघरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे. म्हाडाच्या मागील लॉटरीत मुंबईतील घरांची संख्या अतिशय कमी होती. या लॉटरीतील बहुतांश घरं विरार भागातील होती. त्यामुळे या लॉटरीला फारसा प्रतिसाद लाभला नाही. मात्र म्हाडाच्या पुढील लॉटरीत मुंबईतील घरांचा समावेश आहे. याबद्दलची आकडेवारी 'लोकमत'च्या हाती लागली आहे.

म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा

म्हाडाची पुढील सोडत येत्या एक ते दोन महिन्यात काढली जाऊ शकते. यातील बहुतांश घरं मुंबईतील आहेत. म्हाडाची पुढची सोडत 1194 काढण्यात येईल. यामध्ये सर्वाधिक घरं वडाळ्यातील अँटॉप हिलमध्ये आहेत. एकूण घरांपैकी 278 घरं अँटॉप हिलमधील आहेत. यानंतर मुलुंडमधील गव्हाणपाडा भागात 269 घरं आहेत. याशिवाय महावीर नगरमध्ये 170 घरं आहेत. 

मुंबईत किती, कुठे घरं असणार?
अँटॉप हिल- 278
गव्हाणपाडा- 269
महावीर नगर- 170
प्रतीक्षानगर, सायन- 88
पी. एम. जी. पी., मानखुर्द- 114
पंतनगर- 2
टोगोर नगर, आम्रपाली- 7
पंतनगर OB-1- 2
सहकार नगर- 8
सिद्धार्थ नगर, गोरेगाव- 24
बदानी बोरी चाळ, परळ- 68
तुंगा पवई (2013)- 65
तुंगा पवई (2014)- 2
तुंगा पवई (2016)- 26
मानखुर्द बि. नं. 01- 1
मानखुर्द बि. नं. 03- 1
मानखुर्द (2017)- 2
चांदिवली (2017) 1
गायकवाड नगर, मालवणी मालाड (2015)- 1
ओ. बी. 8 सिद्धार्थ नगर, गोरेगाव- 1
लोअर परेल (2017)- 27
शिंपोली, कांदिवली (2011)- 4
शैलेंद्र नगर, दहिसर (2016)- 1
शिंपोली, कांदिवली प. (2016)- 1
मागाठाणे, बोरिवली (2016)- 1
गोराई रोड, बोरिवली प. - 1
मागाठाणे, बोरिवली (2013)- 1


Web Title: mhada lottery soon know the all details about number of homes and their location in mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.