म्हाडाची लॉटरी आज फुटणार, ८१९ सदनिकांसाठी लॉटरी, ६५,१२६ अर्जदार ठरलेत पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:13 AM2017-11-10T05:13:53+5:302017-11-10T05:14:02+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी

MHADA Lotteries today, Lottery for 819 rooms, eligible for 65,126 applicants | म्हाडाची लॉटरी आज फुटणार, ८१९ सदनिकांसाठी लॉटरी, ६५,१२६ अर्जदार ठरलेत पात्र

म्हाडाची लॉटरी आज फुटणार, ८१९ सदनिकांसाठी लॉटरी, ६५,१२६ अर्जदार ठरलेत पात्र

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतींतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येईल. यंदा ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५,१२६ अर्जदार पात्र ठरले आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली या ठिकाणी आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिका आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाडनगर-मालवणी मालाड अशा २८१ सदनिका आहते. उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल-मुंबई, तुंगा-पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली-कांदिवलीत (पश्चिम) ३३८ सदनिका आहेत. http://mhada.ucast.in  येथे सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या प्रक्षेपण पाहता येईल. http://www.facebook.com/mhadal2017 लिंकवर फेसबुक लाइव्ह प्रक्षेपण पाहता येईल.https://lottery.mhada.gov. in  या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजता सोडतीचा निकाल पाहता येईल.

Web Title: MHADA Lotteries today, Lottery for 819 rooms, eligible for 65,126 applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा