#MeToo : महिलांनी योग्य फोरमवर आवाज उठवावा; महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:42 AM2018-10-11T02:42:04+5:302018-10-11T02:42:25+5:30

‘मी टू’च्या माध्यमातून अनेक महिला त्यांच्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवत आहेत, पण हा आवाज त्यांनी पोलीस ठाणे, राज्य महिला आयोग अशा योग्य फोरमवर उठवावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.

#MeToo: Women should raise voice on the right forum; Appeal appealed by the President of Women Commission, Mr. Rahatkar | #MeToo : महिलांनी योग्य फोरमवर आवाज उठवावा; महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांचे आवाहन

#MeToo : महिलांनी योग्य फोरमवर आवाज उठवावा; महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकर यांचे आवाहन

Next

मुंबई : ‘मी टू’च्या माध्यमातून अनेक महिला त्यांच्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवत आहेत, पण हा आवाज त्यांनी पोलीस ठाणे, राज्य महिला आयोग अशा योग्य फोरमवर उठवावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.
‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, समाजमाध्यमांमधून व्यक्त होऊ नका, असे मला म्हणायचे नाही. तसे केल्याने तुमच्यावरील अन्याय समाजापर्यंत पोहोचेल, पण जगासमोर तो मांडताना न्यायदेखील मिळायचा असेल तर योग्य फोरमवर जावे लागेल. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरविरुद्ध तक्रार केली, पण तिने आयोगासमोर आले पाहिजे, ही आमची भूमिका तिला कळविली आहे.
कायद्यानुसार सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कंपन्या, विद्यापीठांसह प्रत्येक अशा आस्थापना जिथे महिला कार्यरत आहेत त्या ठिकाणी महिलांच्या तक्रारींचे निवारण होण्यासाठी समित्या स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. आम्ही आणखी एक महिना वाट पाहू. सर्व ठिकाणचा आढावा घेतला जाईल. या समित्या स्थापन केल्या नाहीत तर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.

प्रभावी यंत्रणा उभारावी लागेल
लैंगिक छळाच्या संदर्भात जागृतीसाठी महिला आयोग गेले काही महिने सरकारी कार्यालये, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन शिबिरे घेत आहे. आतापर्यंत ४० हजार जणांनी त्यात सहभाग घेतला. या शिबिरांची व्याप्ती वाढविली जाईल. लैंगिक छळाची हिंमत कोणी करताच कामा नये, अशी जरब बसवायची असेल, तर प्रभावी यंत्रणा उभारावी लागेल. त्या दृष्टीने आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे, असे रहाटकर म्हणाल्या.

Web Title: #MeToo: Women should raise voice on the right forum; Appeal appealed by the President of Women Commission, Mr. Rahatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.