#MeTooआणखी दोघींचे अनू मलिकवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:47 AM2018-10-21T06:47:23+5:302018-10-21T06:47:48+5:30

गायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन स्ट्रगलर गायिकांनी संगीतकार अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

#MeToo More allegations against Anu Malik | #MeTooआणखी दोघींचे अनू मलिकवर आरोप

#MeTooआणखी दोघींचे अनू मलिकवर आरोप

Next

मुंबई : गायिका सोना मोहपात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन स्ट्रगलर गायिकांनी संगीतकार अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र, दोघींनीही नावे जाहीर केलेली नाहीत.
एकीने सांगितले की, अनू मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर ते माझ्या बाजूला येऊन बसले. त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली. अनू मलिकने १९९० मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये असभ्य वर्तन केल्याचा आरोप दुसऱ्या स्ट्रगलर गायिकेने केला आहे.

Web Title: #MeToo More allegations against Anu Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.