#MeTooचा सोशल मीडियावर बोलबाला!; अन्यायाला वाचा फोडणारे व्यासपीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 02:22 AM2018-10-10T02:22:17+5:302018-10-10T02:22:42+5:30

बॉलीवूडमध्ये आजपर्यंत कास्टिंग काऊचच्या अनेक घटना समोर आल्या. त्यावरून वेळोवेळी अनेक वादळेही झाली. मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री, निर्माती यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल जाहीरपणे चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.

#MeToo dominated social media !; Critical breakthrough platform | #MeTooचा सोशल मीडियावर बोलबाला!; अन्यायाला वाचा फोडणारे व्यासपीठ

#MeTooचा सोशल मीडियावर बोलबाला!; अन्यायाला वाचा फोडणारे व्यासपीठ

Next

- अजय परचुरे

मुंबई : बॉलीवूडमध्ये आजपर्यंत कास्टिंग काऊचच्या अनेक घटना समोर आल्या. त्यावरून वेळोवेळी अनेक वादळेही झाली. मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक अभिनेत्री, निर्माती यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल जाहीरपणे चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी #MeToo हे सोशल मीडियावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठीे व्यासपीठ ठरत आहे. या पोस्टना नुसते लाइक किंवा शेअर न करता बॉलीवूडमधील इतर कलाकारही अत्याचार झालेल्या अभिनेत्रींना सोशल मीडियावर जाहीरपणे पाठिंबा देत आहेत.
तनुश्री दत्ता प्रकरणात नाना पाटेकर यांनी जे सत्य आहे तेच सत्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेला बॉलीवूÞडमधील काही मंडळींनी पाठिंबा दिला असला तरी अभिनेता फरहान अख्तर, शिल्पा शेट्टी, मलाईका अरोरा, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, हंसल मेहता, आयुष्मान खुराणा यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपले मत परखडपणे मांडत तनुश्री दत्ताला पाठिंबा दर्शविला आहे.
कंगनाने क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. लेखक चेतन भगत, दिग्दर्शक रजत कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होऊ लागले आहेत.
लेखक व स्टॅण्डअप कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांमुळे त्यांच्याशी संबंध तोडल्यानंतर आणि तक्रारी होऊनही कारवाई न केल्यामुळे एआयबी टीकेचे धनी ठरले आहेत. मुंबईतील एआयबी या ‘कॉमेडी कलेक्टिव्ह’चे संस्थापक सदस्य आणि सीईओ तन्मय भट यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नसल्यामुळे ते या पदावरून दूर होत असल्याचे एआयबीने सोमवारी जाहीर केले. लैंगिक गैरवर्तनाचा आरोप असलेले एआयबीचे दुसरे संस्थापक सदस्य गुरसिमरन खंबा यांनाही तात्पुरत्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे.
चूक करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यावर ठोस कारवाई व्हायला हवी, असा सूर बॉलीवूडमध्ये उमटत आहे.

मी टू नाही तर यू टू असा उल्लेख हवा
अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या सोशल मीडियावरील या चळवळीला मी टू नाही तर यू टू असा उल्लेख करून स्त्रियांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाविरुद्ध जाहीरपणे आवाज उठवायला हवा. कारण या प्रकरणांमध्ये त्या नाही तर पुरुष दोषी आहेत, असे मत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने व्यक्त केले आहे.

Web Title: #MeToo dominated social media !; Critical breakthrough platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.