मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:49 AM2019-01-19T05:49:00+5:302019-01-19T09:41:24+5:30

लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द : हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

Mega Blocks on Central, Western Railway | मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर परळ टर्मिनसचे काम सुरू असल्याने आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील परळ टर्मिनसचे काम सुरू असल्याने भायखळा ते माटुंगा डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात सीएसएमटीवरून सकाळी ८ वाजून ४९ मिनिटांपासून ते ५ वाजून ४८ मिनिटांपर्यंत भायखळा येथून माटुंग्याकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा या स्थानकांवर थांबतील. माटुंगा स्थानकानंतर या लोकल जलद मार्गावरून धिम्या मार्गावर धावतील. दरम्यान, या लोकलला चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवर थांबा मिळणार नसून परळ स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर धिम्या, जलद लोकल थांबविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट दिशेकडे जाणाºया सर्व जलद लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून वळविण्यात येतील. तसेच विरार दिशेकडे जाणाºया जलद लोकल बोरीवली ते वसई रोड, विरारपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.

या मेल, एक्स्प्रेस रद्द

रविवारी गाडी क्रमांक ११०१० आणि ११००९ पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१०२ आणि २२१०१ मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२११० आणि १२१०९ मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१२४ आणि १२१२३ पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Mega Blocks on Central, Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.