धर्मांतरासाठी पतीकडून मॉडेलला मारहाण, वांद्र्यातील तरुणाला अटक, १२ वर्षांपूर्वी केले होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:54 AM2017-11-19T01:54:37+5:302017-11-19T01:54:43+5:30

धर्मांतरासाठी ‘मॉडेल’ला पती व तिच्या सासरच्या मंडळींकडून दबाव आणण्यात येत असून त्यांनी मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. लग्नाला बारा वर्षे झाल्यानंतर पती व सासरची मारहाण करीत असल्याची तक्रार मॉडेलिंग करणा-या तरुणीने वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे.

The marriage was done by the husband for conversion, the bride was arrested 12 years ago | धर्मांतरासाठी पतीकडून मॉडेलला मारहाण, वांद्र्यातील तरुणाला अटक, १२ वर्षांपूर्वी केले होते लग्न

धर्मांतरासाठी पतीकडून मॉडेलला मारहाण, वांद्र्यातील तरुणाला अटक, १२ वर्षांपूर्वी केले होते लग्न

Next

मुंबई : धर्मांतरासाठी ‘मॉडेल’ला पती व तिच्या सासरच्या मंडळींकडून दबाव आणण्यात येत असून त्यांनी मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. लग्नाला बारा वर्षे झाल्यानंतर पती व सासरची मारहाण करीत असल्याची तक्रार मॉडेलिंग करणाºया तरुणीने वांद्रे पोलीस ठाण्यात केली आहे.
आसिफ शहबाजकर यास पोलिसांनी अटक केली. रश्मीने १३ वर्षांपूर्वी आंब्याचा मोठा व्यापारी असलेल्या आसिफशी लग्न केले. त्यांना मिखाईल नावाचा मुलगा आहे. पती व सासरची मंडळी धर्म बदलण्यासाठी मारहाण करतात, तसेच शुक्रवारी पतीचा मित्र मुनीबने विनयभंग केल्याची तक्रार तिने केली. तर रश्मीने आपल्याला ठार मारल्याची धमकी दिल्याची आसिफची तक्रर आहे. रश्मीने १३ वर्षांत धर्मांतर सक्तीबाबत तक्रार केलेली नाही. त्यामुळे तक्रारीची सत्यता पडताळत असल्याचे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले.
एक महिन्यापूर्वी आसिफने दुसरे लग्न केले असून सर्व कुटुंब वांद्रे येथे राहते. दुसºया लग्नानंतर रश्मी व आसिफमध्ये वाद होत आहेत.

Web Title: The marriage was done by the husband for conversion, the bride was arrested 12 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा