Maratha Reservation Verdict Live : रामदास आठवलेंकडून स्वागत, मुंडे म्हणाले 'मराठा एकजुटीचा विजय'

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:13 PM2019-06-27T15:13:13+5:302019-06-27T19:26:02+5:30

मुंबई - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर ...

Maratha Reservation Verdict : Maratha Aarakshan Result by Mumbai High Court live updates | Maratha Reservation Verdict Live : रामदास आठवलेंकडून स्वागत, मुंडे म्हणाले 'मराठा एकजुटीचा विजय'

Maratha Reservation Verdict Live : रामदास आठवलेंकडून स्वागत, मुंडे म्हणाले 'मराठा एकजुटीचा विजय'

Next

मुंबई - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुंबईउच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले आहे. मात्र, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देता येणार नसून ते आरक्षण 12 आणि 13 टक्के असणार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.  या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिन आहे.

राज्याचं लक्ष लागलेल्या या निकालाची सुनावणी न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने केली आहे. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतांची गळचेपी असल्याचं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. 

LIVE

Get Latest Updates

07:24 PM

रामदास आठवलेंकडून निर्णयाचे स्वागत

मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या सर्व याचिका बरखास्त करून मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या राज्य शासनाने केलेल्या कायद्याला वैध  ठरविणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. 

 

07:21 PM

मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय, धनंजय मुंडेंकडू निकालाचे स्वागत

अनेक वर्षांपासून मागणी होत असलेला मराठा आरक्षण कायदेशीर असल्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.


05:47 PM

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; उदयनराजेंकडून सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा.



 

04:55 PM

मराठा समाजाचे अभिनंदन, संभाजीराजेंकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली - मराठा समाजाला प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या आरक्षणाचा आनंद झाला आहे. मराठा आरक्षण टिकणं हे महत्वाचं होतं, किती टक्के हा दुसरा मुद्दा आहे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं पाहिजे, पदवीधरपर्यंत मोफत शिक्षण शक्य नाही. मग, बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी केली. राज्यसभेतही बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा मुद्दा आज मी मांडला आहे, असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे. मी मराठा समाजातील सर्व संबंधित घटक, संघटना आणि मराठा समाजाचे अभिनंदन करतो. 
 

04:38 PM

'डॉ. बाबासाहेबांच्या सिद्धांताची गळचेपी', सर्वोच्च न्यायालयात अपील करणार गुणरत्न सदावर्ते

मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतांची गळचेपी असल्याचं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. 

04:29 PM

मराठा आरक्षण हे घटनाबाह्य, याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप

मराठा आरक्षण हे घटनाबाह्य असून या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सरकारने कायद्याचा भंग करून हे आरक्षण दिल्याचंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

हे.

04:18 PM

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधासभवनाता आमदारांचा जल्लोष

मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकले असून हे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यानंतर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत माहिती दिली. त्यानंतर, उपस्थित आमदारांनी जय भवानी-जय शिवाजी असा जयघोष करत जल्लोष केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अस जयघोषही केला.

03:55 PM

मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के तर शिक्षणात 13 टक्के आरक्षण

मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के तर शिक्षणात 13 टक्के आरक्षण देण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. 



 

03:43 PM

मराठाआरक्षण वैध; न्यायालयात आरक्षण टिकले, मराठा जिंकले

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल. मराठा समाजाचा मागासवर्गीय म्हणून समावेश करण्यावर कोर्टाचे शिक्कामोर्तब. आरक्षणाची टक्केवारी 12 ते 13 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची सूचना.

03:41 PM

अपवादात्मक स्थितीत 50 टक्के आरक्षण बदललं जाऊ शकतं

अपवादात्मक स्थितीत 50 टक्के आरक्षण बदललं जाऊ शकतं. मराठा समाजाला आरक्षण, पण 16 टक्के नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

03:36 PM

मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज मागास

मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायलायाचा कल मराठा आरक्षणाच्या बाजुने असल्याचे प्राथमिक सुनावणीवरुन दिसत आहे. 

03:32 PM

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार, उच्च न्यायालयाचं मत

मराठा आरक्षणावरील सुनावणीला उच्च न्यायालयात सुरुवात झाली असून न्यायालयाने पहिलच मत आरक्षणाचा बाजुने नोंदवलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

Web Title: Maratha Reservation Verdict : Maratha Aarakshan Result by Mumbai High Court live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.