फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 10:23 AM2018-09-26T10:23:59+5:302018-09-26T10:24:21+5:30

एका प्रवाशानं चक्क पायलटच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा हट्ट केला आहे.

man tries to enter cockpit of the pilot for charging phone offloaded | फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्...

फोन चार्ज करण्यासाठी तो चक्क घुसला कॉकपिटमध्ये अन्...

Next

मुंबई - विमान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील टॉयलेटचा दरवाजा समजून चक्क विमानाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता एका प्रवाशानं चक्क पायलटच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा हट्ट केला आहे. मुंबईहून कोलकात्याला जाणा-या इंडिगोच्या विमानात हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार पाहून इंडिगोच्या विमानात असलेले प्रवासी आणि क्रू मेंबर्स थक्कच झाले. जेव्हा एक प्रवासी कॉकपिटमध्ये घुसण्याचा हट्ट करू लागला. त्याचा अट्टहास पाहता त्याला विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे. मुंबईहून कोलकात्याला जाणा-या इंडिगोचं विमान 6E-395 मंगळवारी संध्याकाळी 5.55 वाजता उड्डाण करणार होतं. त्याच वेळी एक प्रवासी कॉकपिटमध्ये जाण्याचा हट्ट करू लागला. तो स्वतःचा फोन चार्ज करू इच्छित होता. त्याला क्रू मेंबर्सनी अनेकदा समजावलं, परंतु त्यानं कोणाचंही ऐकलं नाही.

शेवटी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला विमानातून उतरवण्यात आलं असून, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याच्याविरोधात अद्याप कोणतंही एफआयआर दाखल करण्यात आलेलं नाही. 

Web Title: man tries to enter cockpit of the pilot for charging phone offloaded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indigoइंडिगो