मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 12:55 PM2018-06-22T12:55:12+5:302018-06-22T13:22:59+5:30

ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता

Malegaon bomb blast: The verdict of the Colonel Purohita will be decided on July 16 | मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांच्या भवितव्याचा फैसला 16 जुलैला

Next

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला १६ जुलैला होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करावं, अशी मागणी कर्नल पुरोहित यांनी याचिकेतून केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून आज निकाल येण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल १६ जुलैला सुनावण्यात येणार आहे.

मालेगावमधील २००८ मधील बॉम्बस्फोटांप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. कर्नल पुरोहित यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातून दोषमुक्त करावं, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. 

Web Title: Malegaon bomb blast: The verdict of the Colonel Purohita will be decided on July 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.