अखियों से गोली मारे... 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 12:07 PM2018-02-12T12:07:47+5:302018-02-12T12:22:45+5:30

देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक जोरात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जरा हटके आणि वेगवेगळ फंडे आजमावताना दिसत आहे.

malayalam actress debut film priya prakash varrier viral video clip manikya malaraya poovi | अखियों से गोली मारे... 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची रंजक गोष्ट

अखियों से गोली मारे... 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची रंजक गोष्ट

Next

मुंबई - देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक जोरात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जरा हटके आणि वेगवेगळ फंडे आजमावताना दिसत आहे. याच दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलगा व मुलगी इशा-यांतून एकमेकांना आपली 'मन की बात' सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप स्टेटसवर हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे, यावरुन युजर्संना हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचं दिसत आहे. सुंदर हास्य व डोळ्यांनी घायाळ करणा-या या मुलीनं केवळ तरुणच नाही तर तरुणींनाही वेड लावलं आहे.  अनेकांना वेड लावणा-या या नवीन चेह-याचं नाव आहे तरी काय? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जो-तो धडपडत आहे. 

तुमची उत्सुकता अधिक ताणून न ठेवता आपण जाणून घेऊया कोण आहे ही अप्सरा, जिनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी  व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे. प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. 26 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय. 

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांमधील प्रेमाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रिया डोळ्यांच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. तिच्या या अदा अगदी कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे. दरम्यान प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.  

पाहा हा व्हिडीओ

Web Title: malayalam actress debut film priya prakash varrier viral video clip manikya malaraya poovi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.