Major Fire breaks at beaumonde building in Prabhadevi | प्रभादेवीच्या ब्यूमॉन्द इमारतीच्या 33व्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण, कूलिंग ऑपरेशन सुरू

मुंबई: प्रभादेवी परिसरातील ब्यूमॉन्द या इमारतीच्या 33व्या मजल्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या 32 आणि 33 व्या मजल्यावर असलेल्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये लागलेल्या या गीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं आहे. इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासह अनेक उच्चभ्रू व्यक्तींचे फ्लॅट आहेत. अग्निशमन दलाकडून कूलिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. बराच काळ उलटूनही आग आटोक्यात येत नव्हती, त्यामुळे या इमारतीतील अग्निरोधक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, ही तिस-या श्रेणीची आग असल्याची वर्दी अग्निशमन दलाकडून देण्यात आली होती. ही इमारत 10 ते 12 वर्ष जुनी आहे. इमारतीचे बाकीचे मजले रिकामे करण्यात आले असून किती व कसली हानी झाली या संदर्भात काही माहिती समजलेली नाही.  आतापर्यंत इमारतीमधील 90 ते 95 लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 33 व्या मजल्यावर असलेल्या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये काम सुरु होते. त्यावेळी शॉकसर्किट होऊन ही आग लागल्याचे समजते. 

फायर ब्रिगेडच्या शिड्या तोकड्या
ही इमारत 33 मजल्यांची असल्यामुळे अग्निशमन दलाला तिथपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाकडे तेवढ्या 
उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
 

English summary:
The fire breaks out at Beaumond tower in Prabhadevi area ( at Appasaheb Marathe Marg in Worli, Mumbai) on Wednesday (13 June) afternoon. It is understood that a fire originated in a Duplex flat on the building's 32nd and 33rd floors. Check out the video.


Web Title: Major Fire breaks at beaumonde building in Prabhadevi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.