महाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:55 PM2018-10-16T19:55:52+5:302018-10-16T20:18:49+5:30

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी दिवाळीच्या आधीच सरकारनं एक गोड बातमी दिली आहे.

Maharashtra government's good news; Employees 'DA' increased by 3 percent! | महाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला!

महाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला!

googlenewsNext

मुंबई- राज्य सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या आधीच सरकारनं एक गोड बातमी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्याची आली आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2018च्या पगारात कर्मचा-यांना हा वाढीव भत्ता मिळू शकतो. या महागाई भत्त्त्याचा फायदा कर्मचा-यांना पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निघणार असल्याची माहितीही मिळाली आहे. 

Web Title: Maharashtra government's good news; Employees 'DA' increased by 3 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा