नाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:44 AM2018-05-27T05:44:23+5:302018-05-27T05:44:23+5:30

पोलिसांच्या नाकाबंदीचा मुख्य उद्देश हा मद्यपी वाहन चालक, समाज कंटकांवर कारवाई करणे हा असला तरी, भायखळा पोलिसांकडून मात्र त्याला हरताळ फासण्यात आला आहे.

 Looters in the name of blockade | नाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक

नाकाबंदीच्या नावाखाली वाहनचालकांची लुबाडणूक

Next

मुंबई - पोलिसांच्या नाकाबंदीचा मुख्य उद्देश हा मद्यपी वाहन चालक, समाज कंटकांवर कारवाई करणे हा असला तरी, भायखळा पोलिसांकडून मात्र त्याला हरताळ फासण्यात आला आहे. दारुड्या, बेदरकार व विनापरवाना गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईऐवजी महाविद्यालयीन युवकांवर प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) सारखी कागदपत्रे नसल्याची कारणे सांगत कारवाईचा बडगा दाखवित मलिदा मिळविण्याचा फंडा वापरला जात आहे.
शनिवारी सकाळी एका युवकाला अशाच त्रासाला सामोरे जावे लागले. वरकमाई देण्यास नकार दिल्याने ‘पीयुसी’ नसल्याचे कारण दर्शवित पन्हाळे नावाच्या सहाय्यक फौजदाराने लायसन व गाडी ताब्यात घेवूनही तब्बल अडीच तास पोलीस ठाण्यात तिष्टत ठेवले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांसह पोलीस आयुक्तांनी नाकाबंदी दरम्यान करण्यात येणाºया कारवाईचा तपशील घ्यावा, जेणेकरुन पोलिसांकडून ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ देण्याचा प्रकार चव्हाट्यावर येईल, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विनापरवाना वाहन चालवित असला तरी संबंधिताला अटक न करता नोटीस बजाविण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र, भायखळा मार्केट परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर असलेल्या पन्हाळे नावाच्या पोलिसाने एका १८ वर्षाच्या युवकाला ‘पीयुसी’चे प्रमाणपत्र नसल्याचे सांगत अडवून ठेवले. त्याच्याकडील लायसन्स, मोपेड ताब्यात घेत दोनशे रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हुज्जत घालीत असल्याचे सांगत कारवाईचे
चलन फाडीत पोलीस ठाण्यात
घेवून गेला. युवकाने परिचिताला
फोन करुन पोलिसांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता तो गुन्हेगार असल्याप्रमाणे त्याच्याशी वर्तुणूक केली. थातूर मातूर कारण दर्शवित दंडांची रक्कम भरे पर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जावू दिले नाही.

Web Title:  Looters in the name of blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.