प्रचारापासून लांब राहा, अन्यथा...; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:52 AM2019-04-08T11:52:14+5:302019-04-08T12:03:32+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे.

lok sabha election 2019 bhaskar vichare ncp | प्रचारापासून लांब राहा, अन्यथा...; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला धमकी

प्रचारापासून लांब राहा, अन्यथा...; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला धमकी

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील राजकारण आता तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आला आहे.भांडुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील राजकारण आता तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारापासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या सुमारास एका मोबाइल क्रमांकावरून भास्कर विचारे यांना अनोळखी व्यक्तीने हा कॉल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर विचारे यांना धमकीचा एक कॉल आला. या कॉलमध्ये अज्ञात व्यक्तीने दोन शिवसेना आमदारांची नावे देखील घेतली आहेत. यासंदर्भात भांडुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचीही माहिती समोर येत आहे. भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनोज कोटक हे भाजपाचे महापालिकेतील पक्षनेते आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मुलुंडमधून सरदार तारासिंग यांच्या जागी उमेदवारी मागितली. त्यावर तारासिंग चांगलेच भडकले. त्यामुळे मनोज कोटक यांना भांडूप पश्चिममधून उभे करण्यात आले. तेथे त्यांचा पराभव झाला होता. आता राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्याशी त्यांचा सामना असणार आहे.

 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

ईशान्य मुंबईतून भाजपाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी, किरीट सोमय्यांचा पत्ता कट

शिवसेना-भाजपाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी द्यायची याचं घोडं अद्यापपर्यंत अडलं होतं. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनोज कोटक यांच्या उमेदवारीला शिवसैनिकही अनुकूल आहेत. शिवसेनेनं विरोध केल्यानंतर भाजपाकडून प्रवीण छेडा, प्रकाश मेहता, पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे मनोज कोटक यांनीही किरीट सोमय्य्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु भाजपाचे काही जुने नेते किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. 


 

Web Title: lok sabha election 2019 bhaskar vichare ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.