कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:16 PM2018-09-14T17:16:20+5:302018-09-14T17:56:58+5:30

कुर्ला स्टेशनजवळ ही घसरलेली मालगाडी थांबली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून स्थानकावर गर्दी झाली आहे

Local services have been cancelled due to the collision of the goods train near Kurla station | कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विस्कळीत

कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विस्कळीत

Next

मुंबई - हार्बर लाईनवरील कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरली आहे. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. गणेशोत्सव सणानिमित्त बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. गणपती बाप्पांच्या आरास सजविण्यासाठी, खरेदी करण्यास नागरिक घराबाहेर पडले आहेत.

कुर्ला स्टेशनजवळ ही घसरलेली मालगाडी थांबली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून स्थानकावर गर्दी झाली आहे. लोकलची वाट पाहताना रेल्वे प्रशासनाच्या कारभाराला दोष दिला जात आहे. रेल्वेकडून याची दखल घेण्यात आली असून एक लोकल गाडी सोडण्यात आली आहे. रेल्वे गाडी घसरल्यामुळे ही लोकलसेवा बंद पडली असून रेल्वे विभागाने लोकल सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा अर्ध्यातापासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातून घराकडे निघालेल्या आणि गणपती उत्सावामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला असून प्रवाशी लोकलच्या प्रतिक्षेत आहेत.

कुर्ल्याहून पनवेल आणि पनवेलहुन कुर्ल्याला जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मालगाडी घसरल्यामुळे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्म न 7 वर पनवेलला जाणारी लोकल खोळंबली. त्यामुळे कुर्ला स्थानकात प्रवाश्यांची प्रचंड गर्दी पाहायला झाली. दरम्यान मध्य रेल्वेने 5 वाजून 5 मिनिटांनी वाहतूक पूर्ववत केल्याचे ट्विटर वरून स्पष्ट केले. तथापि या गोंधळाचा परिणाम सायंकाळच्या गर्दीच्यावेळेवर होत असल्याने लोकल सुमारे 15 मिनिटे विलंबाने धावतील

Web Title: Local services have been cancelled due to the collision of the goods train near Kurla station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.