लाइट्स, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन! ऊर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्या प्रचाराला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:45 AM2019-04-21T01:45:10+5:302019-04-21T01:46:20+5:30

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात जंगी सामना रंगला आहे.

Lights, Camera, Roll, Action! The crowd gathered to promote Urmila and Gopal Shetty | लाइट्स, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन! ऊर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्या प्रचाराला गर्दी

लाइट्स, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन! ऊर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्या प्रचाराला गर्दी

Next

मुंबई : लाइट्स, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन... अशा काहीशा कृतिशील शब्दांनंतर कलाकारांकडून सेटवरच्या दिलखेचक भूमिका वठविल्या जातात. यात काही नित्यनवे असे नसतेच; पण तीही एक कला असते. कुणालाही ते जमत नाही. मात्र जेव्हा सेटवरचे कलाकार प्रत्यक्ष खऱ्याखुºया आयुष्यात जगतात तेव्हा मात्र कदाचित ते यापासून दूर जाण्याची शक्यता अधिक असते. परंतु उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यास अपवाद ठरल्या आहेत; त्यास कारणही तसेच आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम जोशाने सुरू असून, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात जंगी सामना रंगला आहे. प्रचार आणि प्रसार उत्तरोत्तर रंगत असून, ऊर्मिला ज्या पद्धतीने कॅमेºयास सामोºयास गेल्या आहेत; त्या पद्धतीमुळे त्या लोकांच्या आकर्षणबिंदू ठरल्या आहेत.

प्रचारफेरीत लहान मुलांना कडेवर घेणे, कांदिवली येथील रॅलीदरम्यान ज्युस पिणे, नारळपाण्याचा आस्वाद घेणे, चारकोप येथे प्रचारफेरीदरम्यान तरुणांसमवेत क्रिकेट खेळणे, कांदिवली येथील रॅलीदरम्यान चहा पिणे, छोट्या दोस्तांसोबत फोटो काढणे, ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबमध्ये दाखल होत हातवारे करीत हास्यकल्लोळ करणे, मॉर्निंग वॉकमध्ये सहभागी होणे, गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये सहभागी होत लेजीम खेळणे, कार्यकर्त्यांसमवेत वडापावची चव चाखणे, रिक्षावाल्यांमध्ये सहभागी होत रिक्षा चालविणे आणि प्रचारादरम्यान चप्पल विक्रेत्याकडून चप्पल खरेदी करणे; असे करत करत ताडगोळा खाणाºया, आवळा रस पिणाºया ऊर्मिला मतदारसंघातील नागरिकांना भावत आहेत.

भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा प्रचार प्रसार तळागाळात सुरू असून, सभांसह प्रचारफेरीवर त्यांचा अधिक जोर आहे. ज्येष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची सभा, खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांचे भाषण, मढ येथील कोळीवाड्यात झालेली सभा; या सर्व गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शनिवारी बोरीवली येथे काढण्यात आलेल्या रॅलीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते.

चर्चा तर होणारच...
मालाड येथील डायमंड मार्केट परिसरात दाखल झालेल्या ऊर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीदरम्यान देण्यात आलेल्या ‘मोदी... मोदी...’ अशा घोषणा, तत्पूर्वी बोरीवली पश्चिमेकडे काढण्यात आलेल्या ऊर्मिला यांच्या रॅलीत भाजपचे झेंडे खाद्यांवर घेत तरुणांनी मोदी यांच्या नावाने दिलेल्या घोषणा; या दोन घटनांमुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे.

Web Title: Lights, Camera, Roll, Action! The crowd gathered to promote Urmila and Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.