विधानसभा उमेदवारी; ६ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:03 AM2019-06-23T07:03:38+5:302019-06-23T07:04:03+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे.

Legislative assembly; Deadline to apply till July 6 | विधानसभा उमेदवारी; ६ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत

विधानसभा उमेदवारी; ६ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत

Next

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,
दादर (पश्चिम), मुंबई येथे पाठवायचे आहेत.

Web Title: Legislative assembly; Deadline to apply till July 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.