जाणून घ्या...मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 09:42 AM2017-09-20T09:42:11+5:302017-09-20T17:12:55+5:30

मुंबईत काल दुपारपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे.

Learn ... the state of rail traffic on the Central, Western, Harbor and Trans Harbor Routes | जाणून घ्या...मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची स्थिती

जाणून घ्या...मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीची स्थिती

Next
ठळक मुद्देपावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी, कुठेही रेल्वे वाहतूक ठप्प झालेली नाही.

मुंबई, दि. 20 - मुंबईत काल दुपारपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर आता ओसरला आहे. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी, कुठेही रेल्वे वाहतूक ठप्प झालेली नाही. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-वाशी दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक सामान्य आहे. कुठलीही ट्रेन रद्द झालेली नाही. हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक सुरु असली तरी, नेहमीपेक्षा कमी लोकल धावत आहेत.  

सखल भागात पाणी साचल्यामुळे हार्बर मार्गावर लोकल कमी संख्येने धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. मध्य रेल्वे मार्गावरही वाहतूक सुरळीत आहे. तिथेही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे नेहमीपेक्षा कमी संख्येने ट्रेन धावत आहे. ट्रेन्स काही मिनिटे उशिराने धावत असल्या तरी, रेल्वे कुठेही ठप्प झालेली नाही. 

मुंबई वाहतूक अपडेट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 
मध्य रेल्वे लोकल सेवा सुरळीत सुरू आहे काही लोकल फेरयांचा 15 ते 20 मिनिटे अपवाद आहे. मात्र कोणत्याही रेल्वे फेऱ्या रद्द केलेल्या नाहीत.
हार्बर रेल्वे : लोकल वाहतूक सुरू आहे. काही फेऱ्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
ट्रान्स हार्बर : लोकल वाहतूक सुरू आहे. काही फेऱ्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे.
रस्ते वाहतूक : बीकेसी, दादर, परेल, माटुंगा ताडदेव  दहिसर, कुठे ही पाणी भरल्याची माहिती नाही, परिणामी वाहतूक सुरळीत आहे.
मेट्रो - मेट्रोची वाहतूक सुरळीत आहे, काल तबबल 4.13 लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला.


पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरु आहे. फक्त काही लांब पल्ल्याच्या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. 

- सीएसएमटी ते पुणे डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. 
- मुंबईत पाणी साचल्यामुळे पुणे-भुसावळ-पुणे एक्सप्रेस दौड-मनमाड मार्गे धावेल. 




Web Title: Learn ... the state of rail traffic on the Central, Western, Harbor and Trans Harbor Routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.