गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 07:01 PM2017-11-24T19:01:25+5:302017-11-24T19:04:15+5:30

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती

Late Magazine award will be given to Pushpa Pagadhare, the honorable song on November 26 | गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

गानसम्राज्ञी लता मगेशकर पुरस्कार पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

Next

मुंबई - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा पुष्पा पागधरे यांना २६ नोव्हेंबर रोजी यशवंत नाटय मंदिर,माटूंगा येथे सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली होती. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले,अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे, मुंबईचे पालकमंत्री, सुभाष देसाई, महापौर, विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहूल शेवाळे, आमदार हेमंट टकले, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त विजेते  उत्त्म सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार श्रीमती पुष्पा पागधरे यांना प्रदान केला जाणार आहे.

पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला, संगीताचे धडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु श्री .आर.डी.बेन्द्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि राग रागीनी यांचे शिक्षण घेतले त्यानंतर मुंबईत्‍ येऊन गीत, गझल, भजन आणि ठूमरी हे सुगम संगीत घेण्यास सुरवात केली. पुष्पाताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रसिदध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, प्रभाकर पंडित, डी.एस.रुबेन, विठठल शिंदे, राम-लक्ष्मण, विश्वनाथ मोरे, यशवंत देव इत्यादी अनेक प्रसिदध संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये त्यांना गायनाची संधी मिळाली.

पुष्पाताईंना दोन वेळा शासनाच्या पुरस्कार सोहळयात पार्श्वगायिकेची पारितोषिके मिळाली आहेत. खुन का बदला, बिना माँ के बच्चे, मुकददर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.  त्यांनी मराठी, भोजपुरी, ओडिया, बंगाली,मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

 

या पुरस्काराबरोबर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आदित्य्‍ बिलवकर यांनी सादर केली असून राहूल सक्सेना,मुग्धा वैशपायन, मधुरा कुंभार, जयदीप बगवाडकर, माधुरी करमरकर हे गायक असून सागर टेमघरे, अमित गोठीवरेकर, अमोघ दांडेकर, आशुतोष दांडगे, दिनेश भोसले, वरद काठापूरकर,महेश खानोलकर, कृष्णा मुसळे, हनुमंत रावडे, विवेक भगत, सिदधार्थ कदम व विजय जाधव हे वादक कलाकार आहेत. कोरस नितीन करंदीकर आणि समूह हे करणार असून विघ्नेश जोशी निवेदन करणार असून विनायक चव्हाण हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. पुरस्कारार्थीचा सन्मानार्थ रसिंक प्रेक्षकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, श्री संजय कृष्णाजी पाटील यांनी केले आहे.

Web Title: Late Magazine award will be given to Pushpa Pagadhare, the honorable song on November 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.