'लस्ट स्टोरीज'मधील 'तो' अश्लील प्रकार पाहून लता मंगेशकर कुटुंबीयांचा राग अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 12:58 PM2018-06-23T12:58:59+5:302018-06-23T12:59:59+5:30

'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्यानं खळबळ उडवून दिली आहे.

Lata Mangeshkar’s family upset with Karan Johar for using her song for orgasm scene in Lust Stories | 'लस्ट स्टोरीज'मधील 'तो' अश्लील प्रकार पाहून लता मंगेशकर कुटुंबीयांचा राग अनावर

'लस्ट स्टोरीज'मधील 'तो' अश्लील प्रकार पाहून लता मंगेशकर कुटुंबीयांचा राग अनावर

Next

मुंबईः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं एक तरल, सुरेल गाणं 'लस्ट स्टोरीज' सिनेमात हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे अश्लील कृत्य केल्याबद्दल त्यांनी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करचा 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातील हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच 'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्यानं खळबळ उडवून दिली आहे. या दृश्यावेळी 'कभी खुशी कभी गम' हे गाणं वापरण्यात आल्यानं मंगेशकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्यात. 

लतादीदींचं एक अजरामर गाणं दिग्दर्शक करण जोहर अशा अश्लील दृश्यावेळी कसं काय वापरू शकतो? दीदींनी हे गाणं गायलं, तेव्हा करण भारावून गेला होता. आपलं स्वप्न साकार झाल्याचं म्हणाला होता. मग अशा स्वप्नवत गाण्याशी असा खेळ का केला?, असा सवाल मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी विचारला आहे. या गाण्यातील भाव किती पवित्र आहेत. भजनासारखं हे गाणं हस्तमैथुनाच्या दृश्यावेळी वापरण्याचा विचारही त्याच्या डोक्यात कसा आला, हेच समजत नाही, असंही त्यांनी सुनावलं. आता करण या प्रकाराबाबत काय बोलतो, याकडे लक्ष लागलंय. 

दरम्यान, अनुराग कश्यप, दिवाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर या चार सर्जनशील दिग्दर्शकांनी एकत्र येऊन केलेल्या 'लस्ट स्टोरीज' या धाडसी प्रयोगाचं समीक्षकांकडून कौतुक होतंय. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा आहे. कियारा अडवाणीच्या बोल्ड दृश्यावरून मतमतांतरं आहेत. आता त्यावर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबानंच तीव्र नाराजी व्यक्त केल्यानं चर्चेला अधिकच गांभीर्य आलंय.

Web Title: Lata Mangeshkar’s family upset with Karan Johar for using her song for orgasm scene in Lust Stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.