राजा ढाले यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:27 AM2019-07-18T04:27:40+5:302019-07-18T04:27:43+5:30

दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी दादर चैत्यभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

The last message to King Dhale | राजा ढाले यांना अखेरचा निरोप

राजा ढाले यांना अखेरचा निरोप

Next

मुंबई : दलित पँथरचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी दादर चैत्यभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजा ढाले यांच्या पत्नी दीक्षाताई ढाले, कन्या गाथा ढाले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक, कवी, लेखकांनी मोठी गर्दी केली होती.
मरणोत्तर आपला जलदान विधी किंवा शोकसभा घेऊ नये, अशी राजा ढाले यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांचा जलदान विधी आणि शोकसभा करण्यात येणार नसल्याचे ढाले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
राजा ढाले यांचे मंगळवारी सकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त कळताच राज्यभरातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी मुंबईत धाव घेतली. बुधवारी सकाळी विक्रोळी येथील टागोरनगर येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी १२ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. विक्रोळी पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून संपूर्ण टागोरनगर, कन्नमवारनगर येथून घाटकोपर पूर्वेतील रमाबाई कॉलनी या मार्गे पार्थिव दादर चैत्यभूमी येथे आणण्यात आले. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत राजा ढाले यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारापूर्वी रिपाइं नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, ज. वि. पवार, आमदार जोगेंद्र कवाडे या नेत्यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. याप्रसंगी आनंदराज आंबेडकर, अर्जुन डांगळे, सुषमा अंधारे, गंगाराम इंदिसे, डॉ. सुरेश माने, माजी खासदार एकनाथ गायकवाड, गौतम सोनवणे, काकासाहेब खंबाळकर, भाई गिरकर, दीपक निकाळजे आदी मान्यवरांसह रिपाइंच्या विविध गटांतील व्यक्ती उपस्थित होत्या.

Web Title: The last message to King Dhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.