मुंबई - केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जनतेचं अभिनंदन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी जनता आणि सरकारच्या काही कामांचं अभिनंदन करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकादेखील केली. मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं आहे असं सागंत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारल्याबद्दल लोकांचं अभिनंदन केलं. 

सण कसे साजरे करायचा असा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे, कारण लक्ष्मी केंद्राने ओरबाडून नेली आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी उद्धव ठाकरे जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या कपातीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली. सरकारने दिवाळीची भेट दिली असं चित्र उभं करण्यात आलं आहे. दिवाळीत त्रास देणार नाही ही मोदींची भेट असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. गुजरात निवडणूक पाहता जीएसटीत कपात करण्यात आली आहे असा आरोप सरकारचे विरोधक करत आहेत. पण मला मात्र याबद्दल जास्त माहित नाही असं उद्धव ठाके यावेळी बोलले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेना नेत्यांनी तीन विषय मांडले होते, त्यातील दोन विषय मार्गी लावले असून त्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानत आहोत. अंगणावाडी सेविका आणि रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले हटवण्याचा विषय आम्ही माडंला होता. हे विषय मार्गी लावल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. 

याचवेळी उद्धव ठाकरे यांनी जीएसटीवरुन टीकादेखील केली. जीएसटी कमी करणं हा हा सरकारचा नाइलाज आहे. लोकांच्या संतापाची छळ सरकारला जाणवू लागली आहे. मस्तवाल सत्ताधा-यांना लोकांनी झुकवलं असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. सोबतच जीसएटी कर मागे घेतला आहे, तर मग जो वसूल केला तो परत करणार का ? कमी करायचा होता तर मग इतका कर कशाला लावण्यात आला ? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले. 

पेट्रोल - डिझेलचे भाव ज्या पट्टीने वाढवले त्याप्रमाणे कमी करण्यात यावे तसंच भारनियमन पुर्णपणे रद्द झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. लोकांमध्ये अस्वस्थता असून आता असंतोष निर्माण झाला आहे, त्याचं रुपांतर उद्रेकात होऊ देऊ नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

उद्धव ठाकरे यांनी लोकांचं अभिनंदन करताना तुम्हाला आलेली जाग, आणि तुमच्यातील आग कमी होऊ देऊ नका. अशा एकजुटीने आवाज उठवत राहा असं आवाहन केलं. जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत. जनतेला अपेक्षित असलेला कारभार आम्हाला हवा आहे. सरकारने खाली उतरुन जनतेचे प्रश्न ऐकावेत, त्याप्रमाणे कारभार केला तर जनतेला आदळाआपट करायची गरज लागणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.