कोकण विभागाच्या लॉटरीत ८,७९८ नवीन घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:59 AM2018-07-18T02:59:39+5:302018-07-18T02:59:47+5:30

म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच, ९ हजार १८ घरांची लॉटरी म्हाडाकडून सोमवारी जाहीर करण्यात आली.

Konkan division launches 8,785 new houses | कोकण विभागाच्या लॉटरीत ८,७९८ नवीन घरे

कोकण विभागाच्या लॉटरीत ८,७९८ नवीन घरे

googlenewsNext

मुंबई : म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच, ९ हजार १८ घरांची लॉटरी म्हाडाकडून सोमवारी जाहीर करण्यात आली. या लॉटरीत या वर्षी ८,७९८ घरे नवीन आहेत. तर या आधी २०१६ मध्ये झालेल्या कोकण विभागाच्या लॉटरीतील शिल्लक राहिलेल्या २२० घरांचाही या लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. २०१६च्या तुलनेत लॉटरीतील घरांची संख्या दुप्पट झाली असून, त्यामुळे विरारमधील बोळींज भागात जास्त घरांचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे, मुंबईकरांना आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. मात्र, या घरांवरही जीएसटीचा भार असल्याने ही घरे काहीशी महागणार आहेत. म्हाडाने जाहीर केल्याप्रमाणे अल्प उत्पन्न गटात विरार बोळींज भागात सर्वाधिक ३,७१८ नवीन घरांचा पर्याय उपलब्ध झाला आहे, तसेच मध्य उत्पन्न गटात ठाण्यातील बाळकुम भागात १२५ नवीन घरांचा पर्याय उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त अत्यल्प उत्पन्न गटात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कल्याणमधील खोणी विभागात २,०३२ नवीन घरे, कल्याणमधील शिरढोण विभागात १,९०५ नवीन घरे आणि विशेष नगर प्रकल्पांतर्गत कल्याण आणि अंबरनाथ विभागातील मौजे अंतर्ली, खोणी हेतुटने, कोळे आणि मौजे उंब्रोली भागात ४८७ नवीन घरांचा पर्याय उपलब्ध आहे.
अल्प उत्पन्न गटात विरार बोळींजबरोबरच सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे २४ आणि विशेष नगर प्रकल्पांतर्गत कल्याण आणि अंबरनाथ विभागातील मौजे अंतर्ली, खोणी हेतुटने, कोळे आणि मौजे उंब्रोली भागात ५०२ नवीन घरे लॉटरीत उपलब्ध आहेत. मध्य उत्पन्न गटासाठी सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ५ नवीन घरांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व मिळून ८,७९८ नवीन घरे लॉटरीत उपलब्ध आहेत. उरलेली २२० घरे ही म्हाडाच्या कोकण विभागातील २०१६ च्या लॉटरीनंतर शिल्लक राहिलेली आहेत.
।घरांची संख्या दुपटीने वाढली : २०१६ मध्ये कोकण विभागाची ४,२७५ घरांची लॉटरी निघाली होती. त्या तुलनेत या वर्षीच्या लॉटरीत दुपटीने घरांची संख्या वाढविली आहे. सोबतच घरांच्या किमतीतही जीसटीची भर पडल्याने, थोड्या-फार फरकाने किमतीत वाढ झाली आहे.
नोंदणी आजपासून : या वेळेच्या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी ४०० रुपये किमतीचा फॉर्म भरावा लागणार आहे. गेल्या वेळेस हा फॉर्म ३०० रुपयांना होता. येत्या १९ जुलैपासून अर्जदार आॅनलाइन नोंदणी करू शकतात. तर आॅनलाइन नोंदणीसाठी करावी लागणारी नोंदणी बुधवार दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होईल.
।सोडतीच्या खर्चावर नियंत्रण
या वेळेच्या लॉटरीत आम्ही गेल्या लॉटरीपेक्षा दुप्पट घरांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लॉटरीमध्ये होणाºया खर्चावरही मर्यादा आणत आहोत. दरवर्षी वांद्रेतील रंगशारदा सभागृहात लॉटरीची सोडत असते. यावर जो खर्च होतो, तो कमी करण्यासाठी वांद्रेतील म्हाडाच्या मुख्यालयातच १९ आॅगस्टला सोडत काढण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. म्हाडाच्या वेबसाइेटवरून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
- विजय लहाने, मुख्य अधिकारी, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.

Web Title: Konkan division launches 8,785 new houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा