...अन् बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं चक्क धरले करण जोहरचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 09:49 AM2018-01-23T09:49:13+5:302018-01-23T09:53:00+5:30

बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौत आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांचा आणखी एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. कंगना आणि करणमधील भांडण तर सर्वश्रुत आहे.  पण कंगनानं आता करण जोहरसोबत झालेली सर्व भांडणं बाजूला सारत त्याचे चक्क पाय धरल्याचे वृत्त समोर आले आहे.

kangana ranaut touching feet of karan johar on Indias next superstars | ...अन् बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं चक्क धरले करण जोहरचे पाय

...अन् बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं चक्क धरले करण जोहरचे पाय

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणौत आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांचा आणखी एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. कंगना आणि करणमधील भांडण तर सर्वश्रुत आहे.  पण कंगनानं आता करण जोहरसोबत झालेली सर्व भांडणं बाजूला सारत त्याचे चक्क पाय धरल्याचे वृत्त समोर आले आहे. एवढंच नाही तर कंगना रिअॅलिटी शो 'इंडियाज नेक्स सुपरस्टार्स'मध्ये करण जोहरसोबत गेस्ट जज म्हणूनदेखील हजेरी लावणार आहे.

त्याचं झालं असे की 'इंडियाज नेक्स सुपरस्टार्स' शोदरम्यान, कंगना आणि करणनं 'कभी खुशी-कभी गम' सिनेमातील एक सीन स्टेजवर सर्वांसमोर सादर केला. प्रेक्षकांचं मनोरंज व्हावं, यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीनं कंगना आणि करणला  'कभी खुशी-कभी गम' सिनेमातील सीनंच सादरीकरण करण्यास सांगितले.  यावेळी रोहित शेट्टीनं सांगितले की, 'आम्ही इथे 'कभी खुशी-कभी गम'- पार्ट 2 बनवत आहोत. यामध्ये करण शाहरुख खानच्या भूमिकेत तर कंगना त्याची गर्लफ्रेंड असेल, या सीनचं मी इथे दिग्दर्शन करणार आहे'. 

आणि मग काय, करण आणि कंगना दोघांनीही रोहित शेट्टीच्या विनंतीला मान देत सीनचं शुटिंग सुरू केले. यावेळी करणनं शाहरुखप्रमाणेच एन्ट्री मारली आणि कंगनानं आरतीचं ताट हाती घेऊन करणच्या पायांना स्पर्श करत आशीवार्द घेतला.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगना आणि करणमध्ये घराणेशाहीवरुन वाद सुरू होते. या वादादरम्यान, दोघांनीही एकमेकांबद्दल जाहीररित्या बरंच काही म्हटले. 

Web Title: kangana ranaut touching feet of karan johar on Indias next superstars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.