कमला मिल आग : चौकशी करताना आयुक्तांवर कोणाचा दबाव होता याचा त्यांनी खुलासा करावा - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:21 PM2018-02-05T19:21:05+5:302018-02-05T19:22:45+5:30

अन्यथा आपण हे मान्य करावे की आपण फक्त त्यावेळेस लोकांची दिशाभूल करण्यासाठीच असे वक्तव्य केले होते आणि आपण मुंबईतील संपूर्ण जनतेची जाहीररीत्या माफी मागावी. 

Kamla Mill Fire: They should reveal the pressure on the commissioner while inquiring - Sanjay Nirupam | कमला मिल आग : चौकशी करताना आयुक्तांवर कोणाचा दबाव होता याचा त्यांनी खुलासा करावा - संजय निरुपम

कमला मिल आग : चौकशी करताना आयुक्तांवर कोणाचा दबाव होता याचा त्यांनी खुलासा करावा - संजय निरुपम

Next

मुंबई :  लोअर परेल येथील कमला मिल मधील “वन अबव्ह” आणि “मोजोस” या पब्सला २९ डिसेंबर २०१७ रोजी मोठी आग लागून १४ मुंबईकरांचा नाहक बळी गेला. या घटनेसाठी मुंबई महानगरपालिका आणि मनपा आयुक्तच जबाबदार आहेत, असे मी ठामपणे सांगतो आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयुक्तांवरच सोपवली होती. हे फार चुकीचे होते आणि नाटक होते. मनपा आयुक्त अजोय मेहता हे कमला मिल आग प्रकरणाची चौकशी करत असताना ५ जानेवारी २०१८ रोजी मुंबई मनपाच्या महासभेच्या बैठकीमध्ये त्यांनी असे वक्तव्य केले होते की एका राजकीय बड्या नेत्याने फोन करून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चौकशीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हा खुलासा करताना तुम्ही पुढे सांगितले होते कि या नेत्याची १७ हॉटेलमध्ये भागीदारी आहे, तेव्हा आम्ही अशी मागणी करत आहोत की आपण त्या राजकीय नेत्याचे नाव जाहीर करावे. आज ५ फेब्रुवारी २०१८ आहे आणि तुमच्या मनपा सदन मधील वक्तव्याला एक महिना होऊन गेला तरी हि आपण त्या राजकीय नेत्याचे नाव जनतेसमोर जाहीर केलेले नाही आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मनपा विरोधी नेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर उपस्थित होते.   

एक महिना झाला तरी हि आपण त्या राजकीय नेत्याचे नाव जाहीर करत नाही म्हणजेच स्वतःची असफलता लपविण्यासाठी आणि संपूर्ण राजकीय समुदायला बदनाम करण्यासाठीच आपण हे जाणून बुजून वक्तव्य केले होते हे स्पष्ट होत आहे. तेव्हा आमची अशी मागणी आहे कि आपण त्वरित त्या राजकीय नेत्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे. अन्यथा आपण हे मान्य करावे की आपण फक्त त्यावेळेस लोकांची दिशाभूल करण्यासाठीच असे वक्तव्य केले होते आणि आपण मुंबईतील संपूर्ण जनतेची जाहीररीत्या माफी मागावी. आम्ही मागणीचे पत्र आज मनपा आयुक्तांना हि दिलेले आहे, असे संजय निरुपम म्हणाले.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईमध्येच फक्त पेट्रोल आणि डीझेलची प्रती लिटर किंमत संपूर्ण देशामध्ये जास्त आहे. मुंबईकरांनी शिवसेना भाजपला ६ खासदार, ३० आमदार आणि मुंबई महानगरपालिका दिली त्याच मुंबईकरांवर हा खूप मोठा अन्याय आहे. हि मुंबईकरांची लूट आहे. मुंबईमध्येच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती सगळ्यात जास्त आहे. हा मुंबईकरांवर अन्याय आहे. मुंबईमध्येच सगळ्यात महाग पेट्रोल रुपये ८१/- प्रती लिटर आणि डीझेल रुपये ६८/- प्रती लिटर आणि हि मुंबईकरांची छळवणूक आहे. सगळ्यात जास्त टॅक्स भाजपा सरकार लावत आहे. एक्साइज ड्यूटी, वॅट आणि सेस सर्वात जास्त असल्यामुळे मुंबईकरांना पेट्रोल व डीझेल महाग मिळत आहे. आमची अशी मागणी आहे की भाजपा सरकारने पेट्रोल आणि डीझेलला जीएसटीमध्ये जर आणले तर पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांना अर्ध्या किंमतीत मिळतील. यामुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळेल. तसेच मुंबई कॉंग्रेसतर्फे १२ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकावर या अन्यायकारक पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात ‘‘जनजागरण अभियान’’ करणार आहोत. मुंबईकरांना हि सर्व माहिती देण्यासाठी हे अभियान असेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली.

Web Title: Kamla Mill Fire: They should reveal the pressure on the commissioner while inquiring - Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.