सेलिब्रिटींच्या प्रभावाचा सत्कार्यासाठी उपयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:49 AM2018-03-15T11:49:50+5:302018-03-15T11:49:50+5:30

एखादा सेलिब्रिटी बोलतो, तेव्हा अवघा भारत थांबून ते ऐकतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या नव्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेचा शुभारंभ झाला.

Kajol is fuelling for Swachh Aadat Swachh Bharat | सेलिब्रिटींच्या प्रभावाचा सत्कार्यासाठी उपयोग 

सेलिब्रिटींच्या प्रभावाचा सत्कार्यासाठी उपयोग 

Next

मुंबई - एखादा सेलिब्रिटी बोलतो, तेव्हा अवघा भारत थांबून ते ऐकतो, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. नुकताच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या नव्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेचा शुभारंभ झाला. त्या वेळी या मोहिमेची राजदूत काजोल देवगण हिने आम्हाला आठवण करून दिली की, तिच्यासारखे सेलिब्रिटी मोठ्या जनसमुदायापर्यंत योग्य संदेश पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण तिच्यासारखे कुणी बोलते, तेव्हा अनेक लोकांना ते ऐकण्याची इच्छा होते. हॉलिवूड, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील जागतिक पातळीवरील तारेतारकाही त्यांना योगदान द्यावेसे वाटणाऱ्या गोष्टींना पाठिंबा देतात.

जसे की, वातावरणातील बदल, दारिद्य्र निर्मूलन, महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांत जागृती करणे आणि बदल घडविणे. जागतिक स्तरावर पर्यावरणीय समस्यांवर काम करणारी लिओनार्डो डिकाप्रिओ फाऊंडेशन, यूएनची महिला सदिच्छादूत इमा वॉटसन- साक्षरता, पर्यावरण, समता आणि अन्य अनेक गोष्टींची कडवी समर्थक असून जग आणखी सुंदर बनविण्यासाठी बांधिल आहे. सेलिब्रिटींकडून मिळणा-या या पाठिंब्यामुळे अनेक जागतिक मोहिमांकडे अधिक लोकांचे लक्ष वेधण्यास आणि पाठिंबा मिळविण्यास साहाय्य झाले आहे.
लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी, सत्कार्याला पाठिंबा मिळविण्यासाठी आणि संघटना ज्यांच्यासाठी काम करते अशा पिडितांचा आवाज होण्यासाठी नामवंत संस्था तारे-तारकांचा वापर करतात. उदा. युनिसेफकडे चार जागतिक सदिच्छादूत आहेत. कॅटी पेरी, सरेना विल्यम, नोव्हाक जोकोव्हिच आणि लिम निसन यांच्यासोबतच अमिताभ बच्चनसारखे अनेक प्रादेशिक सदिच्छदूतसुद्धा युनिसेफला जगभरात वाईट अवस्थेत जगणा-या बाल आणि किशोरांचे जीवनमान उंचाविण्यास मदत करतात.

त्याचबरोबर डब्ल्यूएचओ आणि ओएक्सएफएएम इंटरनॅशनलसारख्या संस्थाचेही सदिच्छादूत असतात, जे त्यांची बाजू लोकांसमोर मांडतात आणि त्यांच्या सत्कायार्चा प्रचार करतात. भारतात प्रामुख्याने सिनेतारका आणि क्रिकेटपटूंचा प्रभाव दिसतो आणि अनेक भारतीय सेलिब्रिटी त्यांना योग्य वाटणा-या सत्कायार्साठी खूप मदत करीत आहेत. बदल घडविण्यासाठी भारतीय तारे-तारकांनी बजावलेल्या भूमिकेबाबत पल्स पोलिओ मोहिमेचा उल्लेख केल्याविना केलेली चर्चा अपूर्णच ठरेल.

भारतातील सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक असलेली ही मोहीम सेलिब्रिटींच्या प्रभावाचा उपयोग सामाजिक संदेश घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी केल्याचे उत्तम उदाहरण आहे. अमिताभ बच्चन यांचा कठोर, पण तितकाच आपुलकीचा आवाज, हे बालकांचे लसीकरण करून घेण्यास कुटुंबांना प्रवृत्त करणारे साधन होते. पोलिओच्या नव्या रुग्णांची तीन वर्षांत नोंद न झाल्याने २०१४ मध्ये डब्यूएचओने भारत हा पोलिओमुक्त देश असल्याचे घोषित केले. तसेच विराट कोहलीसारखा सेलिब्रिटी गरीब मुलांसाठी संस्था चालवितो, शबाना आझमी मिजवान नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करते, आमीर खान याने ‘सत्यमेव जयते’सारखा कार्यक्रम केला आणि अन्यही अनेकांनी त्यांचा प्रभाव वापरून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे प्रयत्न केले.

अभिनेत्री काजोल देवगण ही एचयूएलच्या ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ मोहिमेची राजदूत म्हणून अस्वच्छतेच्या माध्यमातून होणारे आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी सक्रिय पाठींबा देत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसामान्य सभेत आणि ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये तिने आरोग्यदायी पर्यावरणाचे महत्त्व विषद केले होते. काजोलने ही मोहीम राष्ट्रीय चळवळ करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यासाठी ‘हाथ, तोंड अॅण्ड बम’ अर्थात दिवसभरात काही प्रसंगी साबणाने हात धुवा, शुद्धिकरण केलेले पाणी प्या आणि शौचालयाचा वापर करा व ती स्वच्छ ठेवा, अशी शिकवण तिने मध्य प्रदेशातील रामकुला येथील मुलांना दिली.

एचयूएलच्या नव्या मोहिमेचा तो एक भागा होता. आरोग्य आणि स्वच्छता यांची भारतात विशेषत: मुलांच्या बाबतीत नेहमीच मोठी चिंता राहिली आहे. एक आई म्हणून मी आरोग्याचे महत्त्व समजू शकते. त्यामुळे स्वच्छ आदत स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होऊन बदल घडविण्यास साहाय्य करणे हा मी माझा गौरव समजते. या मोहिमेचा हेतु प्रत्येकाने स्वत:चा समजून हा संदेश सर्वदूर पोहोचवावा, असे माझे देशाला मन:पूर्वक आवाहन आहे. मला विश्वास आहे की, आपण एकत्रयेऊन, ‘प्लेयिंग बिलिअन’ भारतासाठी यशस्वी करू शकू. - काजोल देवगण

तुम्हीसुद्धा काजोलच्या या मोहिमेत सहभागी होऊ शकता. त्यासाठी www.hul.co.in/sasb या संकेतस्थळावर नोंदणी करा.

Web Title: Kajol is fuelling for Swachh Aadat Swachh Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.