न्यायमूर्ती बी. एच. लोया यांची हत्या कोणी केली ? संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे – संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 06:06 PM2018-01-17T18:06:20+5:302018-01-17T18:11:00+5:30

सोहराबुद्दीन शेख खोटया एनकाऊटर प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाचा सीबीआय न्यायालयात खटला होता. या प्रकरणाचे न्यायमूर्ती बी एच लोया हे होते. त्यांचा नागपूरमध्ये अचानक संशयास्पद मृत्यू झाला, हा मृत्यू नैसर्गिक नाही. याला जबाबदार कोण ? असा आमचा सवाल आहे. उच्च पातळीवर हे प्रकरण दडपण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे.

Justice B H Loya's suspicious death case congress demand Inquiry | न्यायमूर्ती बी. एच. लोया यांची हत्या कोणी केली ? संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे – संजय निरुपम

न्यायमूर्ती बी. एच. लोया यांची हत्या कोणी केली ? संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे – संजय निरुपम

Next

मुंबई: सोहराबुद्दीन शेख खोटया एनकाऊटर प्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाचा सीबीआय न्यायालयात खटला होता. या प्रकरणाचे न्यायमूर्ती बी एच लोया हे होते. त्यांचा नागपूरमध्ये अचानक संशयास्पद मृत्यू झाला, हा मृत्यू नैसर्गिक नाही. याला जबाबदार कोण ? असा आमचा सवाल आहे. उच्च पातळीवर हे प्रकरण दडपण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे. न्यायमूर्ती बी एच लोया यांची हत्या कोणी केली ? हे सर्व जनतेला कळालेच पाहिजे. न्यायमूर्ती बी एच लोया यांच्यासारख्या व्यक्तीला या देशात न्याय मिळत नाही तर सामान्य जनतेला कसा काय न्याय मिळणार, असा आमचा सवाल आहे. या देशाची लोकशाही धोक्यात आहे,लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे उद्गार मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले. संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसतर्फे शांततापूर्ण पद्धतीने “मूक प्रदर्शन” चे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले, न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार कोण ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. आपल्या भारत देशात असे पहिल्यांदाच असे झाले की ४ न्यायमूर्ती एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात आणि लोकशाही धोक्यात आहे हे सांगतात. न्याय व्यवस्था चुकीच्या दिशेने चालली आहे, याची खंत व्यक्त करतात. हे खरच खूप धक्कादायक आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तोगडिया यांना हि आपले एनकाऊटर होईल याची भिती वाटत आहे म्हणजेच या देशात आणि या भाजपा सरकारमध्ये कोणीच सुरक्षित नाही आहे. सामान्य जनता हि सुरक्षित नाही आहे.

आमची अशी मागणी आहे की न्यायमूर्ती बी एच लोया प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. उच्च पातळीवर हे संपूर्ण प्रकरण दडपण्यात येत आहे. तसे न होता या प्रकरणाचा उलगडा झालाच पाहिजे आणि संपूर्ण जनतेला हे कळालेच पाहिजे की त्यांची हत्या कोणी केली, असे संजय निरुपम म्हणाले.

सदर मूक प्रदर्शनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, आमदार वर्षाताई गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सपरा, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील, संदेश कोंडविलकर, नगरसेवक, नगरसेविका आणि मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Justice B H Loya's suspicious death case congress demand Inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.