धकाधकीच्या जीवनात जरा ‘स्वत:’ला जपा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:39 AM2018-02-26T02:39:39+5:302018-02-26T02:39:39+5:30

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. यापूर्वी अभिनेत्री रिमा लागू, अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन याच कारणामुळे झाले होते.

 Just look at yourself in the stressful life, opinion of medical experts | धकाधकीच्या जीवनात जरा ‘स्वत:’ला जपा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

धकाधकीच्या जीवनात जरा ‘स्वत:’ला जपा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. यापूर्वी अभिनेत्री रिमा लागू, अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन याच कारणामुळे झाले होते. श्रीदेवी यांच्या मृत्यूने नेटीझन्सने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली. मात्र, त्यात फेसबुकवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांनी चिरतरुण राहण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियांमुळे, स्टेरॉइड्सच्या सेवनामुळे शरीरावर कासवगतीने का होईना, त्याचे दुष्परिणाम होत असतात आणि मग अचानक एक दिवस त्याचा परिणाम असा समोर येतो, अशा आशयाचा संदेश यात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटींसह प्रत्येकालाच काही क्षण थांबून ‘स्वत:’ला जपण्याचा महत्त्वाचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका या दोन्ही प्रकारांत भिन्नता असते, हे आधी लक्षात घेतले पाहिजे, असे मत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. शैलेश गमरे यांनी सांगितले. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टचा अर्थ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणे होय. हा दीर्घ आजाराचा भाग नाही, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सर्वात धोकादायक मानले जाते. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टला लोक कायम हृदयविकाराचा झटका समजतात. रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते, तेव्हा कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट येतो आणि हृदयविकाराचा झटका ही सर्कुलेटरी समस्या आहे, तर कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बिघाडामुळे होतो.
छातीत दुखणे म्हणजे हृदयविकाराचा झटका आहे, असे नाही. छातीत दुखणे हे हार्ट बर्न किंवा कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टचेही कारण असू शकते. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्णत: बंद होतो. हृदयात वेंट्रिकूलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने, त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होतो. त्यामुळे कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये काही मिनिटाने मृत्यूचा धोका संभावतो, असे डॉ. गमरे यांनी सांगितले.
कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट येण्यापूर्वी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत धडधड, चक्कर, शुद्ध हरपणे, थकवा किंवा अंधारी येणे यांसारखी लक्षणे आढळतात. याच्या इलाजासाठी रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, जेणेकरून त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य करता येतील. याच्या रुग्णांना ‘डिफायब्रिलेटर’द्वारे विजेचा झटका देऊन हृदयाचे ठोके सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोनल जैन यांनी दिली. बºयाचदा त्वचेवरील शस्त्रक्रिया, काही स्टेरॉइडयुक्त औषधांचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. मात्र, ते वेळीच लक्षात येत नाही, यामुळे शरीराला हानी पोहोचते, असेही डॉ. जैन यांनी सांगितले.
स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या!-
-साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटे चालावे, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात, दररोज ध्यानधारणा आणि प्राणायाम करण्याची एक वेळ निश्चित करा.
स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरूर प्या.
वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी संवाद साधा, समुपदेशनचा पर्याय निवडा.
साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटे चालावे, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात, दररोज ध्यानधारणा आणि प्राणायाम करण्याची एक वेळ निश्चित करा.
स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरूर प्या.
वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी संवाद साधा, समुपदेशनचा पर्याय निवडा.

Web Title:  Just look at yourself in the stressful life, opinion of medical experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.