‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:39 AM2018-12-16T07:39:27+5:302018-12-16T07:40:09+5:30

कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे : टिंडर अ‍ॅपमध्ये दिवसाला १ अब्ज फोटो स्वाइप

Just a little while doing 'online dating' ... Where the sex racket is a fraud network | ‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे

‘ऑनलाइन डेटिंग’ करताना जरा जपून... कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे जाळे

मनीषा म्हात्रे

मुंबई : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक अशा विविध सोशल साइट्सवरील डेटिंग साइट ग्रुप, टिंडर अ‍ॅपवर सर्वाधिक तरुण-तरुणी डेटिंगसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या अ‍ॅपवर दिवसाला १ अब्ज फोटो स्वाइप केले जात आहेत. या ऑनलाइन डेटिंगद्वारे हव्या त्या ठिकाणी मुली पुरविण्यात येतात. तर काही ठिकाणी जोडीदाराच्या प्रतीक्षेत अल्पवयीन मुलांपासून वृद्धांनाही पैसे गमाविण्याची वेळ आली आहे.

फेसबुक, इंस्टाग्रामवर असलेल्या डेटिंग खात्यावर तरुणींशी संवाद साधण्यासाठी पैसे मोजावे लागतात. गप्पा मारण्यापासून अश्लील चॅटिंग, व्हिडीओ कॉल, तसेच भेटीसाठी विविध रेट कार्ड ठरलेले आहेत. संवाद साधण्यासाठी एखाद्या खात्यावर पैसे भरल्यास, पुढे ते खातेच ब्लॉक केले जात असल्याचे यात फसलेल्या एका तरुणाने सांगितले.
सहा वर्षांपासून सुरू झालेल्या टिंडर डेटिंग अ‍ॅपमध्ये दिवसाला १ अब्ज फोटो स्वाइप केले जातात. कोट्यवधींमध्ये यांचे युसर्स आहेत. २०१५च्या टिंडर अ‍ॅपच्याच सर्व्हेनुसार, १६ ते २६ वयोगटांतील ३८ टक्के मुले-मुली या अ‍ॅपचा वापर करतात. २५ ते ३४ वयोगटांतील ४५ टक्के, तर ५५ ते ६४ वयोगटांतील १३ टक्के या अ‍ॅपचा वापर करतात. अ‍ॅपद्वारे आपल्या लोकेशननुसार जोडीदाराचा पर्याय मिळतो. काही ओशिवरा, अंधेरी, मालाड, मालवणी भागांत जाऊन तरुण-तरुणींची निवड करतात.
यामध्ये फसलेल्या एका तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, सोशल साइट्सवरून टिंडर अ‍ॅपबद्दल माहिती मिळाल्यावर टाइमपास म्हणून ते डाउनलोड केले. सुरुवातीला जवळच्या अंतरावरील मुली चॅटिंंग, भेटीसाठी दाखविण्यात आल्या. आपल्या मोबाइलवरून ते आपली माहिती मिळवतात. त्यानुसार, पुढे संवाद साधतात. त्यासाठीही ठरावीक रक्कम घेतात, असे तो म्हणाला.
अशा अ‍ॅपमुळे वेश्याव्यवसायाचा मार्ग मोकळा होत असताना दिसत आहे, तर दुसरीकडे तरुण-तरुणींसह अनेक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. केवळ बदनामीच्या भीतीने ते पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. तक्रारच नसेल तर कारवाई कशी करणार? शिवा काही ठिकाणी कमी रकमेची फसवणूक झाल्याने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या नको म्हणत युजर्स गप्प बसतात. त्यामुळे ही प्रकरणे पदड्याआड राहत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

तरुणीच्या फोटोचा वापर

डेटिंग साइटवर फोटो दिलेला नसतानाही तरुणीचा फोटो आणि त्या खाली मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. ही बाब तरुणीला समजताच तरुणीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. फोटोखालील क्रमांक तिचा नसल्याचेही तिने नमूद केले. त्यानुसार, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अशाही स्वरूपाचे गुन्हे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थांबा आणि विचार करा...
आॅनलाइन डेटिंग करताना किंवा कुठल्याही अ‍ॅप, सोशल नेटवर्किंग साइटवर स्वत:ची माहिती शेअर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आपण कुठल्या चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात तर अडकत नाही ना, याचे भान ठेवा. फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधा.
- बलसिंग राजपूत,
पोलीस अधीक्षक, सायबर, महाराष्ट्र

Web Title: Just a little while doing 'online dating' ... Where the sex racket is a fraud network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई