जून, जुलै या दोन महिन्यांत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:51 AM2019-05-20T00:51:43+5:302019-05-20T00:51:47+5:30

राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे आदेश

In June, July, there is no ban on fishing through mechanical boats | जून, जुलै या दोन महिन्यांत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी

जून, जुलै या दोन महिन्यांत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी

Next

मुंबई : १ जून ते ३१ जुलै, २०१९ दरम्यान राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रात यांत्रिक नौकांसाठी मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात मासे आणि अन्य सागरी जिवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने संपूर्ण जून आणि जुलै या दोन महिन्यांत ही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पारंपरिक पद्धतीने करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही, असा आदेश राज्याच्या मत्सव्यवसाय आयुक्त कार्यालयाने जारी केला आहे.


जून, जुलै महिन्यात सागरी जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मत्स्यसाठ्याचे जतन होते, तसेच खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी टाळणे शक्य होते. त्यामुळे सागर किनाºयापासून १२ सागरी मैलापर्यंत या राज्याच्या जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणाºया नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रांतील मासेमारीबाबतचे धोरण लागू राहील. जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक नौका पावसाळी मासेमारीच्या बंदी कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.

बंदी कालावधीमध्ये जलधी क्षेत्रामध्ये यांत्रिक मासेमारी नौकेच्या चलनवलनास पूर्णत: बंदी राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघात झाल्यास शासनाकडून देण्यात येणारी नुकसानभरपाई मिळणार नाही. ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: In June, July, there is no ban on fishing through mechanical boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.