२८ जानेवारी रोजी डोंबिवलीत १ले सायकल मित्र संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:13 AM2018-01-25T11:13:29+5:302018-01-25T11:24:41+5:30

राज्यात गावोगावी गटागटाने सायकलिंग करणा-यांचे अनेक गट वा क्लब तयार झाले आहेत. सायकलिंग सोबत साहसी सायकल भ्रमण ,दीर्घ पल्ल्याच्या सायकल स्पर्धा आणि सायक्लोथोन असे अनेक उपक्रम देखील ठिकठीकाणी होत असतात. सर्वत्र सुरु असलेल्या सायकलिंगला प्रतिष्ठा मिळावी,सायकलिंग करण्याची संख्या वाढावी या उद्देशाने राज्यातील सर्व सायकल मित्रांना एकत्र आणणारे पहिले सायकल मित्र संमेलन २८ जानेवारी, रविवारी डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे.

On January 28, 1 st Cycle Friends meeting in Dombivli | २८ जानेवारी रोजी डोंबिवलीत १ले सायकल मित्र संमेलन

२८ जानेवारी रोजी डोंबिवलीत १ले सायकल मित्र संमेलन

googlenewsNext
ठळक मुद्देसंमेलनाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता डोंबिवली शहरात सायकल रॅली काढून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण संमेलनाचे उद्घाटक

डोंबिवली : राज्यात गावोगावी गटागटाने सायकलिंग करणा-यांचे अनेक गट वा क्लब तयार झाले आहेत. सायकलिंग सोबत साहसी सायकल भ्रमण ,दीर्घ पल्ल्याच्या सायकल स्पर्धा आणि सायक्लोथोन असे अनेक उपक्रम देखील ठिकठीकाणी होत असतात. सर्वत्र सुरु असलेल्या सायकलिंगला प्रतिष्ठा मिळावी,सायकलिंग करण्याची संख्या वाढावी या उद्देशाने राज्यातील सर्व सायकल मित्रांना एकत्र आणणारे पहिले सायकल मित्र संमेलन २८ जानेवारी, रविवारी डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे.
क्रीडा भारती कोकण विभाग,डोंबिवली सायकल क्लब आणि नॅशनल यूथ आॅर्गनायझेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पहील्या सायकल मित्र संमेलनाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता डोंबिवली शहरातील पाच विविध ठिकाणाहून सायकल रॅली काढून करण्यात येणार आहे. त्या सायकल रॅलीमध्ये डोंबिवली ,कल्याण ,पलावा सिटी ,अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुंबई, पुणे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह १ हजार सायकलस्वार सहभागी होणार आहेत. या सगळ्या रॅली टिळक चौक येथे एकत्र आल्यानंतर घरडा सर्कल मार्गे सावित्रीबाई फुले नाट्यगृह प्रवेशद्वाराजवळ ८.३० वाजता समाप्त होणार आहे.
सकाळी ९ वाजता सावित्रीबाई नाट्यगृहात या पहिल्या सायकल मित्र संमेलन होणार असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण संमेलनाचे उद्घाटक असणार असून यावेळी क्रीडा भारतीचे महामंत्री राज चौधरी उपस्थित राहणार आहेत. चार सत्रात होणा-या संमेलनात आॅडीओ आणि व्हिज्युअल प्रेझेन्टेशनद्वारे सायकलिंगचे विविध पैलू उलगडण्यात येणार आहेत. याशिवाय नामवंत सायकलपटू संजय मयूरे ,दोन्ही पाय गमावल्यानंतर सुद्धा सायकल प्रवास करणारे सुशील शिंपी, जागतिक विक्रमवीर संतोष हाळी, महिला आणि अंध सायकलपटू आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा या संमेलनात ऐकण्याची संधी प्रत्यक्ष मिळणार आहे. त्याचप्रमाणे सायकल स्वारांसाठी अत्यंत उपयोगी अशा आरोग्य व सुरक्षा विषयी तज्ञांचे मार्गदर्शन देखील होणार आहे. या संमेलनाच्या समारोपाला आमदार संजय केळकर उपस्थित राहणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायकल मित्रांचे परस्परातील समन्वय, सहकार्य वाढावे आणि कार्यात कायम सातत्य राहावे यासाठी हे सायकल मित्र संमेलन असल्याचे संयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी स्पष्ट केले .
 

Web Title: On January 28, 1 st Cycle Friends meeting in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.