आयटीआयकडे गुणवंतांचा कल; प्रवेशासाठी ४ लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:53 AM2018-11-07T06:53:54+5:302018-11-07T06:54:10+5:30

रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होत आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या तब्ब्ल २६५ विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ITI's quality trend; 4 lakh applications for admission | आयटीआयकडे गुणवंतांचा कल; प्रवेशासाठी ४ लाख अर्ज

आयटीआयकडे गुणवंतांचा कल; प्रवेशासाठी ४ लाख अर्ज

Next

मुंबई : रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होत आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या तब्ब्ल २६५ विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. यंदा राज्यभरातून तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, डिझेल मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट यांसारखे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच पुस्तकी आणि व्यावहारिक असे दोन्ही ज्ञान मिळत असल्याने ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थीही या क्षेत्राला प्राधान्य देतात. गुणवंतांसोबतच ३५ टक्के व त्यापैकी कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनीही आयटीआयला पसंती दर्शवली आहे. कमी गुण असलेल्या ४६० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

दहावीचे निकाल लागल्यानंतर सुरू होणाºया प्रवेश प्रक्रियेमध्ये आयटीआयचा पर्याय ‘सर्वात शेवटचा’ असेल, असा कयास होता. मात्र, आता तो बदलल्याचे चित्र आहे. यामुळे यापुढेही आयटीआयमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

Web Title: ITI's quality trend; 4 lakh applications for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.