इंद्राणी, पीटर मुखर्जीची स्वतंत्र चौकशी, परदेशातील गुंतवणुकीतील गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, December 08, 2017 4:33am

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिकाºयांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली.

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा पती पीटर मुखर्जी यांची सीबीआयच्या अधिकाºयांनी स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. सुमारे तीन तास चाललेल्या चौकशीत त्यांच्याकडून आयएनएक्स मीडिया कंपनीची मलेशियातील गुंतवणुकीची माहिती घेण्यात आली. परदेशी गुंतवणूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही सखोल चौकशी होती, असे सूत्रांनी सांगितले. हे चौकशीचे सत्र शुक्रवारी सुरूच राहणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. इंद्राणी सध्या भायखळा तर पीटर आॅर्थर रोड जेलमध्ये आहे. देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी त्याची आई इंद्राणी व सावत्र पिता पीटर मुखर्जी सुमारे दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पीटर मुखर्जीने आयएनएक्स या कंपनीची स्थापना केली होती; तर इंद्राणी तिची मुख्य कार्यकारी अधिकारी होती. या कंपनीच्या कोट्यवधींच्या शेअर्सचे व्यवहार अमेरिका, इंग्लंड, मलेशिया आदी देशांत झाल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यात परदेशी गुंतवणुकीसाठीच्या ‘एफईपीबी’चे उल्लंघन केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. या संदर्भातील चौकशीसाठी सीबीआयने न्यायालयात दोघांची कस्टडी मागितली होती. कोर्टाने मंजुरी दिल्याने सीबीआयच्या एका पथकाने आॅर्थर रोड जेलमध्ये तर दुसºया पथकाने भायखळ्यात जाऊन दोघांची स्वतंत्र चौकशी केली. या कंपनीमधील अन्य भागीदार, गुंतवणुकीबाबत माहिती घेण्यात आली असून शुक्रवारीही ही चौकशी सुरू राहणार असल्याचे अधिकाºयाने सांगितले.

संबंधित

सीबीआयकडून इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची स्वतंत्र चौकशी, तीन तास कसून विचारणा
शीना बोरा हत्या; पीटर मुखर्जीनेच केले शीनाचे अपहरण ; इंद्राणीचा आरोप

मुंबई कडून आणखी

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन, निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्री
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल दहा वर्षांनी परतला मुंबईत
कमला मिल दुर्घटनेला पालिका प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार
Kamala Mills Fire : कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युगी तुलीला अखेर अटक
धोक्याची घंटा ! उद्योगपती-व्यापा-यांनीच राज्यात, देशात भाजपाचे राज्य आणले, त्यांचेच बळी जाताहेत - उद्धव ठाकरे

आणखी वाचा