Increasing political intervention, circulation of 'General Administration' | बदल्यांमध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप, ‘सामान्य प्रशासन’चे परिपत्रक

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमधील बदल्यांत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने की काय, पण ‘बदल्यांसाठी राजकीय दबाव आणणारे अधिकारी, कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
कर्मचाºयांच्या सेवा शर्ती व अटींमध्येच हे नमूद असते. तथापि, वर्षानुवर्षे त्याची पायमल्ली होत आहे. बदल्यांसाठी लोकप्रतिनिधींची पत्रे सतत फिरत असतात. या पत्रांच्या आधारे बदल्या करवून घेणाºयांची कमतरता नाही. बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांची नेहमीच चर्चा होत आली आहे. बदल्यांसाठी राजकीय दबाव आणू नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीही सूचना केल्या होत्या. आता पुन्हा याबद्दल विभागाने बजावले आहे.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी या परिपत्रकाचे स्वागत केले. तथापि, बदल्यांसाठी दबाव आणणाºया कर्मचारी, अधिकाºयांविरुद्ध सरकार कारवाई करणार असेल, तर बदल्यांसाठी प्रशासनावर दबाव आणणाºया लोकप्रतिनिधींविरुद्धही कारवाई झाली पाहिजे, असे मत कुलथे यांनी व्यक्त केले.