An important decision for customers to pay online payment without any charge, MSEDCL | ऑनलाइन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना, महावितरणचा ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय
ऑनलाइन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना, महावितरणचा ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय

मुंबई : ग्राहकांना ऑनलाइनद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिटकार्ड व यूपीआय पद्धतीने विजदेयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क  केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल ऍ़पद्वारे ग्राहक विजदेयकाचा ऑनलाईन भरणा करु शकतात. ऑनलाईन विजदेयकाचा भरणा करताना केवळ क्रेडीटकार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पध्दतीने (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) विजदेयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबील भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबील भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या    ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात. ग्राहकांनी वीजबील भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या निशुल्क ऑनलाइन वीजबिल भरणा सेवांचा फायदा घ्यावा व वीजदेयकाचा भरणा ऑनलाइन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.


Web Title: An important decision for customers to pay online payment without any charge, MSEDCL
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.