जन्मजात दोषांवर होणार तातडीने उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:27 AM2018-03-19T02:27:56+5:302018-03-19T02:27:56+5:30

जन्मजात दोष असणाऱ्या मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रमुख रुग्णालयांसह आता पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्येही स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे.

Immediate treatment for congenital defects | जन्मजात दोषांवर होणार तातडीने उपचार

जन्मजात दोषांवर होणार तातडीने उपचार

googlenewsNext

मुंबई : जन्मजात दोष असणाऱ्या मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रमुख रुग्णालयांसह आता पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्येही स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. वरील मागणी माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती. ही मागणी पालिका प्रशासनाने मान्य केली असून, अशी व्यवस्था पालिकेच्या सर्व महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.
जन्मजात दोषांवरील उपचाराचा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे कित्येक गरीब कुटुंबातील मुले पैशांअभावी उपचारापासून वंचित राहतात. अशा मुलांना व त्यांच्या पालकांना दिलासा देण्यासाठी पालिकेच्या प्रमुख व इतर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी महासभेत ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही मागणी पालिका महासभेत मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती.
स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिकमध्ये बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, न्यूरो सर्जन व इतर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी व बालमृत्यूचे प्रमाण कमी करावे, असेही या सूचनेत नमूद करण्यात आले होते. या सुचनेला आयुक्त अजय मेहता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित अधिकाºयांना त्यानुसार कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. केईएम व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयांत ही सुविधा आहे. महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांत ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
>महत्त्वाच्या रूग्णालयात मिळणार सुविधा
केईएम व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयांत ही सुविधा आहे. महत्त्वाच्या सर्व रुग्णालयांत ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
जन्मजात दोषांमध्ये नवजात अर्भकाची सर्वसाधारण वाढ न होणे, मेंदूची वाढ न होणे, अर्भक गतिमंद असणे, हृदयात दोष, हाडांची वाढ न होणे अशा अनेक दोषांचा यात समावेश असतो. अशा प्रकारच्या दोषांवर तत्काळ शस्त्रक्रिया, योग्य उपचार न झाल्यास ते
मूल दगावण्याची शक्यता असते.

Web Title: Immediate treatment for congenital defects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.