आयआयटी बॉम्बेत प्रयोगादरम्यान स्फोट; तिघे किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 05:43 PM2019-03-30T17:43:58+5:302019-03-30T17:46:01+5:30

मुंबई - आयआयटी बॉम्बेच्या एरोस्पेस विभागाबाहेरील प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपाारी साडेबाराच्या सुमारास प्रयोगादरम्यान छोटा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ जखमी झाले. ...

In IIT laboratory Bombay blast; Three minor injuried | आयआयटी बॉम्बेत प्रयोगादरम्यान स्फोट; तिघे किरकोळ जखमी

आयआयटी बॉम्बेत प्रयोगादरम्यान स्फोट; तिघे किरकोळ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देएरोस्पेस विभागाबाहेरील प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपाारी साडेबाराच्या सुमारास प्रयोगादरम्यान छोटा स्फोट झाला.ते सध्या आयआयटी बॉम्बेच्या मेकॅनिकल विभागात अर्धवेळ कर्मचारी म्हणूनही कार्यरत आहेत.

मुंबई - आयआयटी बॉम्बेच्या एरोस्पेस विभागाबाहेरील प्रयोगशाळेत शुक्रवारी दुपाारी साडेबाराच्या सुमारास प्रयोगादरम्यान छोटा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ जखमी झाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी नॅशनल बर्न्स सेंटर, ऐरोली येथे पाठविल्याची माहिती आयआयटी जनसंपर्क विभागाने दिली.
तुषार जाधव यांनी २०१२ साली आयआयटीतून पदवी घेतली. त्यानंतर आयआयटीच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अ‍ॅण्ड एंटरप्रेनरशिपअंतर्गत मॅनस्तू स्पेस सुरू केले. ते सध्या आयआयटी बॉम्बेच्या मेकॅनिकल विभागात अर्धवेळ कर्मचारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी प्रयोगासाठी दोन इंटर्न्सही घेतले आहेत. हे विद्यार्थी आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी नाहीत, असे आयआयटीने स्पष्ट केले. ते प्रयोग करत असताना हायड्रोजन फुग्यांचा स्फोट झाल्याने तिघेही जखमी झाले.

Web Title: In IIT laboratory Bombay blast; Three minor injuried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.