इंधन दरवाढ नियंत्रणासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 12:36 PM2018-05-28T12:36:14+5:302018-05-28T13:07:00+5:30

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

I hope Govt uses Saam, Daam, Dand Bhed to control Fuel ke Daam, Aaditya Thackeray slams cm Devendra Fadnavis | इंधन दरवाढ नियंत्रणासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

इंधन दरवाढ नियंत्रणासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next

मुंबई - पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेले द्वंद्व अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्धात आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. इंधन दरवाढीवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ''पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा'', अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे. ट्विटरवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

(उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर) 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना दिल्या होत्या. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप शिवसेनेनं एका जाहीर सभेमध्ये समोर आणली होती. यावरुन आता उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  


काय आहे नेमके प्रकरण?

दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. 'अरे ला कारे'च करायचं.. 'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे. मात्र, भाजपाने या ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे.  

(मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण ऑडिओ ऐकवला....)

तर दुसरीकडे, शनिवारी (26 मे) देवेंद्र फडणवीस यांनी या क्लिपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग वसईतील जाहीर सभेत ऐकवला आणि शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला. 'आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे', हे त्याच ऑडिओ क्लिपमधील पुढचे संवाद मुख्यमंत्र्यांनी ऐकवले आणि शिवसेनेवर पलटवार केला. पराभव दिसतो, तेव्हाच अशा स्तरावर जावं लागतं, साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असं सुनावत, आपण स्वतःच ही ऑडिओ क्लिप निवडणूक आयोगाला देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: I hope Govt uses Saam, Daam, Dand Bhed to control Fuel ke Daam, Aaditya Thackeray slams cm Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.